गोंदिया, दिनांक : 12 नोव्हेंबर 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गोंदिया जिल्हाध्यक्ष श्री गंगाधरजी परसुरामकर यांनी आज दि. 12 नोव्हेंबर रोजी भारतीय काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश केला, गेले अनेक वर्षे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकरिता काम केले, मात्र काही महिन्यापूर्वी त्यांचा गोंदिया जिल्हाध्यक्ष पद काढल्यानंतर त्यांना महाराष्ट्र राज्याच्या कार्यकारणी मध्ये शामिल करण्यात आले होते.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेस पक्षासाठी त्यांनी काम केलं असं बोललं जात होते, त्यामुळेच कुठेतरी पक्षाकडून नाराजीचा सूर होता, आणि त्याच काळापासून गंगाधरजी परशुराम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे पाठ फिरवली, राष्ट्रवादी पक्षाच्या कुठल्याही कार्यक्रमात ते दिसत नव्हते त्यामुळे त्यांनी पक्ष सोडला असं बोललं जात होतं, मात्र आज दिनांक : 12 नोव्हेंबर रोजी गोंदिया येथील कार्यक्रमात त्यांनी पक्षप्रवेश केल्याचे मंचावरून सांगितले दरम्यान ते सदर मंचावर उपस्थित होते.
गोंदिया विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार गोपाल दाजीश अग्रवाल यांच्या प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते, दरम्यान कार्यक्रमात गंगाधरजी परशुरामकर यांचा पक्षप्रवेश झाला, यावेळी खासदार राहुल गांधी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, खासदार प्रशांत पडोळे, माजी आमदार गोपालदासजी अग्रवाल, सह अन्य बडे नेते उपस्थित होते, दरम्यान कार्यक्रमाला हजारोच्या संख्येमध्ये कार्यकर्त्यांची उपस्थिती होती, या उपस्थिती वरून असं वाटत होते की राज्यामध्ये काँग्रेसची ( महाविकास आघाडीची ) सरकार येणार, असे असले तरी 20 तारखे नंतर काय समीकरण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.