गोंदिया, दि. 09 नोव्हेंबर : ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या 2024 इलेक्शन दॅट सरप्राईज या पुस्तकात मंत्री छगन भुजबळ यांच्या संदर्भात खळबळ जनक दावे केले आहे, ज्यात ईडी पासून सुटकेसाठी भाजपासोबत गेलो असं भुजबळ च्या नावाने या पुस्तकात दावा केला आहे या संदर्भात प्रफुल पटेल यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता, हा दावा प्रफुल पटेल यांनी फेटाळून टाकला आहे, अजिबात नाही आम्ही गेलो आहे विकासासाठी.
भारतीय जनता पार्टीची आमची युती आहे फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि मोदी साहेबांच्या नेतृत्व हे सगळ्यांना आवडणार आहे, देशाला सामोर घेऊन जाणार आहे. देशाची आर्थिक आणि सगळ्या क्षेत्रांमध्ये प्रगती झाली आहे. त्यांच्या विकास नामाच्या आधारावर त्यांच्याबरोबर महायुतीमध्ये आहोत असं स्पष्टीकरण प्रफुल पटेल यांनी दिला आहे.
भांडण होऊ नये म्हणून झुकता माप घेऊ, प्रफुल पटेल यांचे धक्कादायक विधान.
मुख्यमंत्री साठी तरतूद केली आहे, मात्र मुख्यमंत्री पर्यंत नको अजित पवार यांच्या वक्तव्य प्रफुल पटेल यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता. ते म्हणाले की आमच्या पक्षाने महायुतीच्या धर्म पाळण्याच काम केले आहे. भांडण होऊ नये म्हणून थोडा झुकता माप घेऊन महाराष्ट्रामध्ये महायुतीची सरकार चांगला रीतीने निवडून यावी त्या हिशोबाने आमची भूमिका राहिली असल्याची माहिती प्रफुल पटेल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.