संजय पुराम यांच्यासाठी राजेंद्र जैन यांनी आमगाव शहरात घेतली प्रचार सभा.

आमगाव, दि. 09 नोव्हेंबर : आमगाव – देवरी विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार संजय पुराम यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी चे नेते राजेंद्र जैन यांनी आमगाव शहरात राष्ट्रवादी कॉग्रेस च्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली असून या विधानसभा निवडणुकीत आपलाच उमेदवार निवडून आणू असा विश्वास कार्यकर्त्यांनी राजेंद्र जैन यांना दिला आहे.

बैठकिला महायुतीचे उमेदवार संजय पुराम यांनी हजेरी लावत या मतदार संघात 2014 पासून 2019 पर्यत आमदार असताना अनेक विकास कामे केली यांची माहिती कार्यकर्त्यांना देत माजी आमदार असताना कधी माजी आमदारा सारखा वावरलो नाही त्यामुळे लोकांच्या समस्या ह्या माज्या समस्या आहेत.

असेच समजत कोट्यावधीचा निधी खेचून आणत विकास कामे केल्याचे सांगितले. तर या कार्यकर्ता बैठकीत आमगाव सालेकसा तालुक्यातील शेकडो कर्यकर्त्यांनी हजेरी लावत महायुतीचा उमेदवार निवडून येईल असा विश्वास दिला आहे.

Leave a Comment

और पढ़ें