- विनोद अग्रवाल यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी होते उपस्थित.
गोंदिया, दि. 09 नोव्हेंबर : गोंदिया विधानसभा क्षेत्रातील भाजपाचे उमेदवार विनोद अग्रवाल यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दि. 08 नोव्हेंबर रोजी गोंदिया येथील सभेत संबोधित करत असताना त्यांनी काँग्रेस वर निशाणा साधला. काँग्रेसच्या कार्यकाळात मागील साठ वर्ष काँग्रेसला संधी मिळाली, काँग्रेस पक्ष देशाच्या भविष्याला नाही बनू शकत, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले, यावर ते थांबले नाही ते म्हणाले की काँग्रेसने देशात भुखमरी आणि बेरोजगारी वाढवण्याचे काम केलं आहे.
तुमच्या करता तुमच्या भविष्य बदलणाऱ्या पक्ष आणि उमेदवारांचा विचार करा, विनोद अग्रवाल च्या रूपात चांगला उमेदवार उभा आहे. आणि मी तुमच्यासमोर हात जोडून अनुरोध करतो की आपला आशीर्वाद कमल चा बटन दाबून विनोद अग्रवाल यांना द्यावा असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. यावरच ते थांबले नाही ते म्हणाले की इतक्या मोठ्या संख्येत लोक आले आहे की यंदा विनोद अग्रवाल मोठ्या अंतराने विजयी होणार, की विदर्भ आणि महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड मार्जिन विजयी होणारा उमेदवार ठरणार आहेत.