खासदार प्रफुल पटेल जी माझे आदर्श – नगरसेवक दानेश साखरे

  • दानेश साखरे यांचे बंडखोरी तून युटर्न, प्रफुल पटेल साखरेंच्या भेटीला ? 

अर्जुनी मोर. दि. 07 नोव्हेंबर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( अजीत पवार गट ) चे राष्ट्रीय नेते, माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार प्रफुल पटेल हेच आपले राजकीय गुरु असुन माझे आदर्श नेते आहेत. त्यांचे आदेशाचे पालन करने हे आपले आद्यकर्तव्य असल्याचे मत अर्जुनी मोर. नगरपंचायती चे नगरसेवक तथा गोंदिया जिल्हा युवक राष्टवादी काॅग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष दानेश साखरे यांनी व्यक्त केले.

खा. प्रफुल पटेल हे दि. 6 महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांचे प्रचारार्थ अर्जुनी मोर. येथे आले असता त्यांनी दानेश साखरे यांचे राहते घरी सदिच्छा भेट दिली. भाईजींच्या भेटीने भारावुन गेलेले दानेश साखरे यांनी वरील प्रतीक्रिया पत्रकारांकडे व्यक्त केली.
अनुसुचित जाती साठी राखीव असलेल्या 63 अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्राची जागा महायुतीमधे राष्ट्रवादी कांग्रेस च्या अजीत पवार गटाकडे गेली.

गेल्या दोन वर्षांपासून या विधानसभेत आपल्याला उमेदवारी मिळेल या आशेवर दानेश साखरे यांनी या क्षेत्रात राष्ट्रवादी कांग्रेस ची मोठी फळी निर्माण केली. संपुर्ण विधानसभा क्षेत्र पिंजुन काढला होता.

मात्र वरिष्ठ स्तरावर झालेल्या प्रचंड राजकीय घडामोडींत माजी मंत्री तथा भाजपाचे नेते ईंजी. राजकुमार बडोले यांना ताबडतोब राष्ट्रवादीत प्रवेश करवुन उमेदवारी जाहीर केल्याने नाराज झालेले दानेश साखरे यांनी स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केला होता. व अपक्ष निवडणुक लढवुन जिंकण्याचा निर्धार सुध्दा केला होता. मात्र ऐनवेळी भाईजींच्या शब्दाचा मान ठेवत दानेश साखरे यांनी आपला उमेदवारी अर्ज ऐनवेळी मागे घेतला.

अशा परिस्थितीत दानेश साखरे यांची नाराजी दुर करण्याचे निमीत्ताने प्रफुल्लभाई पटेल यांनी साखरे यांचे घरी सदिच्छा भेट देवुन त्यांची नाराजी दूर करून भविष्यात आपले कुठेतरी समायोजन करुन राजकिय क्षेत्रात आपल्या मजबुत करु अशी ग्वाही भाईजींनी दिली. या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांना निवडुन आणण्यासाठी आपन संयुक्त काम करावे असे आवाहन केले.

दानेश साखरे यांनी भाईजींच्या आदेशानेच आपली पुढील राजकिय कारकिर्द सुरु ठेवुन महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांना निवडुन आणण्यासाठी काम करु असे आश्वासन दिले. या सदिच्छा भेटी वेळी. खा. प्रफुल्लभाई पटेल सोबत भाजपचे नेते डाॅ.परिणय फुके, महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले, भापाचे लायकराम भेंडारकर, राष्ट्रवादीचे यशवंत गणवीर, तथा महायुतीतील मित्रपक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें