आ. विनोद अग्रवाल यांनी हजारो समर्थकांसह आज उमेदवारी अर्ज केला दाखल

गोंदिया, दि. 24 ऑक्टोंबर : गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी भारतीय जनता पक्षाकडून महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून गुरुवारी 24 रोजी गोंदियातून हजारो समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महायुती पक्षाकडून माजी मंत्री व भारतीय जनता पक्षाचे आमदार डॉ. परिणय फुके, भाजपचे जिल्हाध्यक्ष येशुलाल उपराडे, मध्यप्रदेश चे माजी मंत्री गौरीशंकर बिसेन, माजी आमदार रमेश भटेरे, वीरेंद्र (बाळाभाऊ) अंजनकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजेंद्र जैन, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले, शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे, आरपीआय गटाचे भाऊ गजभिये, पं.स. सभापति मुनेश रहांगडाले, कृउबास सभापति भाऊराव उके, छत्रपाल तुरकर यांच्यासह महायुतीचे अनेक बडे नेते, पिरिपा कवाडे गटाचे नेते उपस्थित होते.

आमदार विनोद अग्रवाल यांच्या उमेदवारीसाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे हजारो कार्यकर्ते स्वागत लॉन येथे जमले होते. जनताच्या आमदार विनोद अग्रवाल यांनी घरून निघण्यापूर्वी आपली आराध्य देवी “माँ मांडोदेवी” ची पूजा, अर्चना केली आणिनंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात पोहोचून परम पूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यांनी नगर परिषद येथे स्व.मनोहरभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पित केले.

नामांकन मिरवणुकीत आमदार विनोद अग्रवाल यांच्यासह त्यांच्या पत्नी व कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी त्यांच्या पत्नीने “कहो दिल से- विनोद अग्रवाल फिर से’चा आवाज बुलंद केला.

अवघ्या ५ वर्षात परिसराचे चित्र बदलण्याचे ऐतिहासिक काम जनताच्या आमदाराने केल्याचे भाजप नेत्यांनी आवर्जून सांगितले . ते म्हणाले, जे अतुलनीय काम त्यांनी 27 वर्षात केले नाही ते कार्य फक्त 5 वर्षात झाले आहे. गोंदियातील जनता पूर्णपणे जनताच्या आमदाराच्या पाठीशी आहे.

विजय निश्चित, कमळ फुलवून विक्रम करू

विनोद अग्रवाल यांच्या नामांकनावेळी सर्व समाजातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने त्यांचा विजय पुन्हा निश्चित झाल्याचे दिसून आले. सर्व समाजातील लोकांनी विनोद अग्रवाल यांचे कौतुक केले आणि सांगितले की ते जात-धर्माची पर्वा करत नाहीत आणि विकासावर बोलतात. गोंदिया विधानसभा मतदारसंघात खुर्ची मिळवणे हे त्यांचे ध्येय नसून संपूर्ण समाजाची प्रगती, उन्नती व विकास हेच त्यांचे ध्येय आहे. गोंदियातून विनोद बाबूंचा विजय निश्चित असून ते कमळ फुलवून गोंदियात ऐतिहासिक विक्रम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जनसमुदायाला संबोधित केले, कमळ फुलणार, इतिहास रचणार

स्वागत लॉनच्या विशाल मैदानात जमलेले हजारो समर्थक व महायुतीचे कार्यकर्त्याना, मंचावरुन आमदार विनोद अग्रवाल, आमदार डॉ.परिणय फुके, मध्यप्रदेशचे माजी मंत्री गौरीशंकर बिसेन, माजी खासदार सुनील मेंढे, एनसीपीचे माजी आमदार राजेंद्र जैन, शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे, अशोकभाऊ इंगळे, डॉ. घनश्याम पानतावणे, दिनेश दादरीवाल, नेतराम भाऊ कटरे, माजी आमदार भेरसिंगभाऊ नागपुरेसह आदी अनेक नेत्यांनी उपस्थित हजारोंच्या जनसमुदायाला संबोधित करून यावेळी कमल गोंदियात इतिहास घडवेल असा विश्वास व्यक्त केला.

ठिकठिकाणी जनतेच्या आमदारांचे भव्य स्वागत, पुष्पवृष्टी

नामांकन मिरवणुकीत जनताच्या आमदार विनोद अग्रवाल यांचे सर्व समाज बांधवांनी जल्लोषात स्वागत केले. घरोघरी पुष्पवृष्टी करून विजयाचे आशीर्वाद दिले. या मिरवणुकीत प्रत्येक समाजाबरोबरच मुस्लिम व बौद्ध समाजातील लोकांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवली व आमदाराचे स्वागत, अभिवादन व सत्कार केला.

Leave a Comment

और पढ़ें