(रात्री 11 : 00 वाजता नदी पात्रात टिपलेले छायाचित्र)
- रात्रीला रोजगार हमी योजना नदी पत्रात सुरू!
सडक अर्जुनी, दि. 19 ऑक्टोंबर : सडक अर्जुनी तालुक्यातून वाहणाऱ्या अनेक नदी व नाल्यातून वाळूचा मोठ्या प्रमाणात दरवर्षी अवैध रित्या उपसा केला जातो, हा वाळूचा उपसा रात्री 10 वाजता पासून सुरू होतो आणि सकाळी आठ वाजता पर्यंत सुरू असतो, रात्रीला नदी पात्रात सर्वत्र अंधार असतो, मात्र ज्या भागात वाळूचा उपसा सुरू असतो, त्या भागात अनेक वाहनांचा उजेड लख लखतो, म्हणून या भागात येलीयण आले की काय? असा सभ्रम निर्माण होतो, कारण अधिकारी वर्ग जेव्हा यांच्यावर कारवाई करण्यासाठी जातात तेव्हा हे गायब होतात, आणि अधिकारी गेले की हे पुन्हा नदी पत्रात दिसतात.
त्या मुळे हा चमत्कार होतो तरी कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे, यांच्यावर कारवाई करणे आता कठीण झाले असून या जमिवरील वाळू चोर येलीयणचा खरा सूत्रधार कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे, हा चमत्कार तालुक्यातील पळसगाव, फुटाळा, सावंगी, पिपरी, तेली घाटबोरी, वडेगाव, कोहमारा, चिरचाडी, घोगरा घाट, परसोडी, डोंगरगाव, रेंगेपार, खडकी/बा., सह अनेक ठिकाणी पाहण्यासाठी मिळते.
- रोजगार हमी योजना नदी पत्रात सुरू!
या अवैध वाळू वाहतुकीमुळे शासनाला रोज लाखो रुपयांचा फटका बसत आहे, मात्र या अवैध वाळू वाहतुकीमुळे अनेक गावातील बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे, बेरोजगार युवकांना रात्रीची खाजगी मध्ये रोजगार हमी योजना मिळाली असून त्यांचा उदरनिर्वाह आता चालत आहे, ही रोजगार हमी योजना नदी पत्रात सुरू असून महसूल व पोलिस विभाग कधी पर्यंत सुरू ठेवणार हे पाहण्यासारखे असेल?