गोरेगाव, दी. 10 सप्टेंबर : आता महिलांना विचार करण्याची वेळ आली आहे, ग्राम पंचायत मध्ये आरक्षण आहे म्हणून महिला पदावर आहेत, नगरपंचायत मध्ये आरक्षण आहे म्हणून महिला पदावर आहेत, जिल्हा परिषद मध्ये आरक्षण आहे म्हणून महिला पदावर आहेत, आमदार खासदार मध्ये आरक्षण नाही म्हणून महिला पदावर नाही, पण मग मंत्र्यांच्या घरच्या महिला, मोठ्या राजघरातिल महिला, आमदार खासदार का बर आहेत, या प्रश्नाचे उत्तर राजकारणी लोकांनी द्यावा, नाहीतर निवडणुकीच्या वेळेस विचार करण्याची वेळ आता महिलांवर आली आहे.
जर आमदार खासदारकी मध्ये महिलांना प्राधान्य नसेल तर महिलांचा मतदानावेळी मत घेण्याचाही अधिकार राजकारणी लोकांना नाही असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदश्या किरणताई कांबळे यांनी उपस्थित जन समूहाला मार्गदर्शन करताना केले, ते दी. 08 सप्टेंबर रोजी गोरेगाव तालुक्यातील ग्राम चोपा निंबा येथील गणेश उत्सव मंडळात आयोजीत कार्यक्रम दरम्यान मंचावरून बोलत होते, दरम्यान गणेश उत्सव मंडळाच्या आयोजकांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, नागरिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला.