आमची संस्कृती जगातील अत्यंत वैभवशाली संस्कृती : माजी मंत्री राजकुमार बडोले

  • राजकुमार बडोले फाउंडेशन यांच्या वतीने आदिवासी जनजागृती मेळावा व सत्कार समारोह उत्साहात संपन्न.

अर्जुनी मोर, दिनांक : 09 सप्टेंबर 2024 : जो जो रस्त्यात भेटेल त्या सगळ्यावर प्रेम करणारी आमची संस्कृती आणि म्हणून आमची संस्कृती ही जगातील अत्यंत वैभवशाली संस्कृती आहे असे मत सामाजिक न्याय विभागाचे माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी मंचावरून व्यक्त केले ते दिनांक : 08 सप्टेंबर रोजी गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोर तालुक्यातील ग्राम पवनी/ धाबे येथे आयोजित राजकुमार बडोले फाउंडेशन च्या वतीने भव्य आदिवासी मेळावा व समाजातील गुणवंत विद्यार्थी तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाज बांधवांचे सत्कार समारंभ या कार्यक्रमा प्रसंगी मंचावरून उपस्थित जनसमूहाला मार्गदर्शन करताना बोलत होते.

ते पुढे म्हणाले आमची कला ही जगातील अत्यंत वैभवशाली कला आहे, आपण वारली कला जर पाहिली असेल तर मोठ्या मोठ्या फाइव स्टार हॉटेलमध्ये पाहायला मिळते, याचे कारण म्हणजे आमचे निश्चित प्रेम घडलेलं आहे, आणि हाच प्रेम जगाला कुठेतरी कळलं आणि नंतर जागतिक आदिवासी दिनाची सुरुवात झाली, खूप उशिरा झाली, तरी पण आज आमची परिस्थिती अशी आहे, आज आमच्याकडे शिक्षणाचा अभाव आहे, कारण जग पुढे गेलं, तो 21 व्या शतकात गेलं, तो कॉम्प्युटरच्या जगात गेलं, तो तंत्रज्ञानाच्या जगात गेलं, विज्ञानाच्या जगात गेल, आम्ही कुठेतरी मागे पडता कामा नये, असे आम्हाला वाटते म्हणून जगाच्या बरोबर आम्ही गेले पाहिजे, परंतु प्रश्न येतो की आमचे शिक्षण किती झाले, आमचे पोरं किती आयएएस झाले, आमचे पोरं किती इन्स्पेक्टर झाले, आमचे पोरं किती कलेक्टर झाले यावर प्रकाश टाकत त्यांनी आदिवासी समाजाप्रती मत व्यक्त करताना खंत व्यक्त केली.

आदिवासी भाषेतील नृत्यांचे आयोजन…

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्राम पंचायत पवनी धाबे येथून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, मोठ्या उत्साहात कार्यक्रमा स्थळी रॅली आल्यानंतर महामानवांच्या प्रतिमे समोर दीप प्रज्वलन करीत माल्याअर्पण करण्यात आले, तर उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले, त्याचबरोबर उपस्थित पाहुण्यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले, आलेल्या पाहुण्यांचे स्वागत गीताने स्वागत करण्यात आले त्याचबरोबर आदिवासी भाषेतील नृत्यांचे आयोजन देखील करण्यात आले होते. 

मंचावर उपस्थित पाहुणे… 

यावेळी मंचावर केंद्रीय अध्यक्ष आदिवासी ध्रुव गोंड समाज दृग चे एम.डी. ठाकूर उपस्थित होते तर आदिवासी आघाडी प्रदेश सचिव तथा सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ चे डॉ. प्रकाश गेडाम, माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, माजी आमदार संजय पुराम, चंदाताई कोडवते, दुर्गाप्रसाद कोकोडे, विशेष अतिथी म्हणून अर्जुनी मोर पंचायत समितीच्या सभापती सविता कोडापे, उपसभापती होमरात पुस्तोडे, माजी सभापती प्रकाश गहाणे, पंचायत समिती सदस्य नाजूक कुंभरे, हरिचंद्र उईके, तानेश ताराम, लक्ष्मीकांत धानगाये, हनवंत वटी, पं.स. सदस्य चेतन वडगाये, सुदाम कोवे, प्रल्हाद वरठे, जिल्हा परिषद सदस्य लायकराम भेंडारकर सह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

 

त्यांनाही भेटवस्तू देण्यात आल्या… 

भव्य आदिवासी जनजागृती मेळावा चे औचित्य साधून प्राविण्य प्राप्त गुणवंत आदिवासी विद्यार्थी, आदिवासी समाजातील आजी- माजी पदाधिकारी, नवनियुक्त कर्मचारी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता यांचा सत्कार करण्यात आला. मेळाव्या निमित्ताने मार्गदर्शन करण्यात आले, मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी बिरसा मुंडा स्मारक समिती, बिरसा मुंडा युवा स्मारक समिती, बिरसा मुंडा महिला स्मारक समिती पवनी/ धाबे तथा आदिवासी आघाडी तालुका अर्जुनी मोरगाव यांनी विशेष परिश्रम घेत या जनजागृती मेळाव्याला यसस्वि केले आहे. दरम्यान त्यांनाही भेटवस्तू देण्यात आल्या. 

 

बडोले साहेब यांना पुन्हा आपण विजय करा…

सदर कार्यक्रम प्रसंगी मंचावरून बोलताना उपस्थित पाहुण्यांनी काँग्रेस पक्षावर टीका केली ते म्हणाले गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाकडून देशात खोटे नरेटीव पसरवून संविधान बदलणार असे सांगत आपल्या समाजाला भ्रमित करण्याचे काम केले आहे. आपण आता जागृत झालो पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान एवढे कमजोर नाही, येत्या निवडणुकीमध्ये माजी मंत्री राजकुमार बडोले साहेब यांना पुन्हा आपण विजय करून मंत्रिपदावर विराजमान करण्याचे आव्हान केले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन येथील घर असो वा ईनदू मिल येतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक यासारखे असंख्य काम राजकुमार बडोले यांनी करून आपल्या समाजाला नवी दिशा दाखविण्याचे काम केले आहे. असेही पाहुणे मंचावरून बोलत होते.

 

Leave a Comment

और पढ़ें