- खात्यांची केवायसीकरिता,माय माऊल्यांची धडपड
गोरेगाव, दि. 31 ऑगस्ट : गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव शहाराअंतर्गत बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा गोरेगाव येथे जवळपास ९० हजार खातेधारक असुन, बॅंकेचे काम संथ गतीने सुरू आहे. रा.का. शरद पवार पक्ष जिल्हा कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम गोरेगाव तालुक्यातील दौऱ्यावर असतांना, बँक ऑफ महाराष्ट्र येथील खातेधारकानी केवायसी करण्यासाठी, होणाऱ्या त्रासाबद्दल सांगितले.
माय माऊल्यांनी व्यथा मांडली. ते ऐकताच मिथुन मेश्राम यांनी बॅंकेत जाऊन शाखा प्रबंधक यांच्यासी चर्चा केली. व १० काऊंटर लावुन लवकरात लवकर केवायसी चे काम पुर्ण करा असे सांगितले. कुठल्याही खातेदारांना त्रास होऊ नये याची दक्षता घ्यावी. व ८ दिवसात ते काम पुर्ण करा. अन्यथा बॅंकेला कुलुप ठोकणार असा निर्वाणीचा इशारा मिथुन मेश्राम यांनी दिला.
सविस्तर असे की, गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र यांची शाखा असून, या शाखेमध्ये तालुक्यातील लोकांचे जवळपास 90 हजार खाते आहे. या बँकेत, ग्राहकांची अलोट गर्दी दररोज राहत असून, वेगवेगळ्या योजनेनुसार, ग्राहकांची खाते आहेत. परंतु, कित्येक खातेदारांची केवायसी अपूर्ण आहे. केवायसी म्हणजे “तुमच्या ग्राहकाला जाणून घ्या. “ही एक प्रक्रिया आहे. ज्याद्वारे बँक ग्राहकाची ओळख आणि पत्त्याबद्दल माहिती मिळवितात.
ही प्रक्रिया बँकांच्या सेवांचा गैरवापर होणार नाही याची खात्री करण्यास मदत करते. केवायसी प्रक्रिया बँकांनी खाती उघडताना पूर्ण केली पाहिजे. आणि वेळोवेळी ती अपडेट केली पाहिजे. यानुसार गोरेगाव येथील बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मनुष्यबळाची संख्या कमी असल्यामुळे, केवायसी करण्यासाठी खातेधारकांची दररोज झुंबड असते. केवायसी करण्यासाठी ग्राहकांना त्रास सहन करावे लागत आहे.
यातच, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम गोरेगाव तालुका दौऱ्यावर असताना, बँकेतील खातेधारकांनी केवायसी अंतर्गत समस्या व्यक्त केली. तेव्हा मिथुन मेश्राम यांनी बँकेत जाऊन शाखा प्रबंधक यांच्याशी चर्चा केली. केवायसी करिता दहा काउंटर ची व्यवस्था करण्यासाठी सांगितले. आठ दिवसात केवायसी चे काम पूर्ण करा अन्यथा बँकेला कुलूप ठोकणार असा इशारा मिथुन मेश्राम यांनी दिला.