सडक अर्जुनी, दि. 26 ऑगस्ट : तालुक्यातील ग्राम पंचायत खोडशिवनी येथे रक्षाबंधन चे कार्यक्रम दि. 25 ऑगस्ट रोजी उत्साहात साजरा करण्यात आले यावेळी गावातील मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या, महिलांनी उपस्थित मान्यवरांना राखी बांधत त्यांचे तोंड गोळ केले व मान्यवरांनी रक्षाबंधन भेटीचे उपस्थित महिलांना भेट वस्तूंचे वाटप केले हा बहीण आणि भावांचा रूनानुबंध असाच चालत राहावा याकरिता दरवर्षी रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करण्यात येते. सरपंच गंगाधर परसुरामकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सरपंच गंगाधर परशुरामकर, डॉ. आर.बी. वाढई प.स. सदस्य, उपसरपंच सत्यवान नेवारे, आशिष टेंभूरकर सदस्य, उध्दव परशुरमकर अध्यक्ष से. स. संस्था, महेश बोरकर अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, इंदुताई परशुरामकर ग्रा.प. सदस्या, तसेच बचत गटाच्या महिला, आय सी आर पी महिला पदाधिकारी, तसेच गावातील अन्य महिला यांच्या उपस्थितीत कार्यक्रम साजरा करण्यात आला.