गोंदिया, दि. 22 ऑगस्ट : सडक अर्जुनी येथील चुलबंद डॅम च्या वेस्ट वेअर मध्ये आंघोळ करण्यासाठी गेलेल्या दोघांचा २१ ऑगस्ट रोजी मृत्यू झाल्याने तालुक्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील मृतक कादिर मतीम शेख २७ वर्ष व मो. कैफ मतीन शेख वय २१ वर्ष हे दोन्ही चुलबंद डैम चे वेस्टे वेअर च्या खोल पाण्यात आंघोळी करिता गेले असता यातील नामे मो. कैफ मतीन शेख वय २१ वर्ष हा खोल पाण्यात बुडाला व त्याला वाचवण्यासाठी गेलेला कादिर मतीम शेख वय २७ वर्ष हा सुध्दा बुडाल्याने फिर्यादी रशिद मतीन शेख वय २६ वर्ष रा. सडक अर्जुनी, याचे रिपोर्टवरून पोस्टे डुग्गीपार येथे मृत्यु. क. ४४/२०२४ कलम १९४ भा.ना.स. २०२३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदर घटनेचा तपास पो.ह.वा. इस्कापे / ४८८ पो.स्टे. डुग्गीपार हे करीत आहेत.
Author: Maharashtra Kesari News
Post Views: 759