अर्जुनी मोर. तालुका कडकडीत बंद, हजारोंच्या मोर्च्यासह तहशिलदारांना निवेदन सादर

अर्जुनी मोर., दि. 22 ऑगस्ट : सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्ट 2024 ला अनु. जाती, अनुसूचित जमाती च्या विरोधात दिलेल्या संविधान विरोधी निर्णयाचे निषेधार्थ व अनुसूचित जाती- जमाती, ओबीसी, बहुजनांच्या हक्क अधिकारांसाठी आज संपुर्ण भारत बंद ची हाक देण्यात आली. त्यानुसार आज अर्जुनी मोर. तालुका कडकडीत बंद पाडण्यात आला. तर दुर्गा चौक ते तहशिल कार्यालयापर्यंत हजारोंच्या संख्येने अत्यंत शांततेत मोर्चा काढुन तहशिलदार अनिरुद्ध कांबळे यांना निवेदन देण्यात आले.

अनुसूचित जाती -अनुसूचित जमाती आरक्षणात उपजाती वर्गीकरणास सर्वोच्च न्यायालयाने एक ऑगस्ट 2024 ला दिलेल्या निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. यामुळे अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या सामाजिक ऐक्याला मोठा धक्का बसणार आहे. त्यामुळे आज विविध मागासवर्गीय संघटनांनी भारत बंदची हाक दिली होती. त्यानुसार आज अर्जुनी मोरगाव तालुक्यात कडकडीत बंद पाडण्यात आला. तालुक्यातील केशोरी, महागाव, नवेगाव बांध इथेही बंद पाडण्यात आला. अर्जुनी मोरगाव शहरात सर्व व्यापारी बंधूंनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून या भारत बंदला पाठिंबा देत कडकडीत बंद पाडला. सकाळी 11 वाजता अनुसूचित जाती- जमाती, आदिवासी गोवारी समाज ओबीसी समाज व इतर मागासवर्गीय समाजाचे लोक दुर्गा चौक अर्जुनी मोर येथे जमा झाले.

त्यानंतर दुर्गा चौकातून विविध घोषणा देत हजारोच्या संख्येने मोर्चा शहारातील मुख्य मार्गावरून तहसील कार्यालयात नेण्यात आला. व त्या ठिकाणी अनेक मान्यवरांनी मोर्चाला मार्गदर्शन केले. व त्यानंतर तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. या मोर्च्यात अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी, आदिवासी गोवारी, व ईतर मागासवर्गीय समाजातील महिला, पुरुष, व तरुण वर्ग हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते.

Leave a Comment

और पढ़ें