शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी काढला कँडल मार्च.
गोंदिया, दि. 14 ऑगस्ट : कोलकाता येथील आर. जी. मेडिकल कॉलेजमध्ये घडलेल्या घटनेने सगळा देश हादरला आहे. येथे काम करणाऱ्या एका ज्यूनियर महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची निघृण हत्या करण्यात आली. या घटनेला घेवून डॉक्टरांमध्ये संताप दिसून येत आहे. त्यातच या घटनेचे पडसाद आता गोदियातही उमटू लागले आहे.
आज दि. 14 रोजी गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी घटनेचा निषेध करीत कॅण्डल मार्च काढत श्रद्धांजली वाहीली तर या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, त्वरित ऑडिट करून सर्व वैद्यकीय संस्थांमध्ये सुरक्षेच्या उपाययोजना लागू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
Author: Maharashtra Kesari News
Post Views: 213