खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्याकडे पुरपिड़ीत नागरिकांनी केली मागणी.

गोंदिया, दि. 29 जुलै :  जिल्ह्यातील सड़क/अर्जूनी तालुक्यातील चिंगी या गावचा संपर्क तुटला असून, अतीवृष्ट्रीमुळे शेतकरी हतबल झाले आहे. अनेकांची घरे पडली, नवेगावबांध ओव्हरल्फो सुरू झाल्याने खोबा ते चिंगी सम्पर्क तुटला, विद्यार्थी, शेतकरी, यांची तारांबळ उडाली आहे.

यामुळे गोसावी कोकणा, चिंगी, बोळदे, वांगी, नैनपुर, पापड़ा, इत्यादी गाव अती पावसामुळे संकटात सापडले आहेत. असे असतांनाही शासन, प्रशासन गाड झोपेत आहे. पीड़ीतांना तातडीने मदत मिळावी म्हणून परिसरातील नागरिकांनी खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्याकडे धाव घेतली. खासदार महोदयांनी तातडीने जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून पीडितांना तात्काळ मदत करावी व पंचनामा करून त्यांना शासनाची मदत देण्यात यावी.

शासनाकडून तात्काळ त्यांची मदत मिळवून देण्याचे आश्वासन खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी दिले. निवेदन सादर करताना शंकर मेंढे, अर्जुन घरोटे माजी प.स.सदस्य, देवचंद शिवणकर, धनराज आसटकर अध्यक्ष शेतकरी संघटना, धनलाल शेंडे मार्कंड खोटोले उपस्थित होते.

 

Leave a Comment

और पढ़ें