गोंदिया, दी. 21 मे : शहराच्या बाजार पेठेत लवकरच विक्री करिता येणार तब्ब्ल अडीच लक्ष रुपये किलोचा मियाँझांकी आबा, जपानच्या मियाझाकी शहरात उत्पादित केला जाणारा मियाझाकी आंबा आता गोंदिया शहरात देखील उत्पादित केला जात आहे.
गोंदियातिल प्रगतशील शेतकरी भालचंद्र ठाकूर यांनी जपान देशात उत्पादित करण्यात येणाऱ्या मियाझाकी आंब्याची आपल्या शेतात तीन वर्षा आधी लागवड केली असून या वर्षी प्रथमच मियाझाकी आंब्याचे उत्पादन त्यांच्या हाती आले असून विदर्भात देखाली शेतकऱ्यांनी आंबा लागवड करून आर्थिक प्रगती साधावी म्हणून त्यांनी आपल्या शेतात आंबा कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
या कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कृषी शास्त्रद व्ही. डी. मायी, महादेश फॉर्म पुणे चे अध्यक्ष सचिन नलवडे, रेशीम संचालनाचे माजी संचालक डॉ. लक्ष्मीकांत कॅलतंरी, वनस्पती रोग शास्तज्ञ डॉ. सुभाष पोटदुखे, डॉ. रुची एग्रो चे अध्यक्ष एस. एम. ठाकूर यांनी हजेरी लावीत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी रुची एग्रो चे संचालक भालचंद्र ठाकूर यांनी आपल्या शेतात अनेक विदेशी प्रजातीच्या आंब्याची लागवड केली असून फळ उतपादन देखील सुरु झाले आहेत यात केन्ट आंबा, लीली आंबा, ऑस्टिन आंबा, मियाझाकी आंबा, नुरजहा आंबा, यासारखे विदेशी आंबे तर,लंगडा, केशर, आम्रपाली, नीलम, मल्लिका, हापूस या सारख्या भारतीय प्रजीतच्या आंब्यांची लागवळ सोबत च केळी, पपिता, पांढरी जांभूळ, करवंद, चिकू आदी फळांची लागवड करून उत्पादन घेत विक्री करीत आहेत.
मात्र ज्या पद्धतीने कोकणातला हापूस आंब्याला बाजारात मागणी आहे. त्याच प्रमाणात केशर आंब्याला देखील मोठी मागणी असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी केशर आंब्याचे उत्पादन घेत आपली आर्थिक उन्नती साधावी असा सल्ला देखील भालचंद्र ठाकूर यांनी दिला आहे. विदर्भात देखील मोठ्या प्रमाणात केशर आंबा उत्पादित होऊ शकतो असे कृषी शास्तज्ञानचे म्हणणे असून या कार्यशाळेला भंडारा गोंदिया जिल्यातील शेतकर्यांन सह बाजूला लागून असलेल्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ राज्यातील शेतकर्यानी देखील हजेरी लावत आंबा कार्यशाळॆत आंबा उत्पदना बद्दल माहिती जाणून घेत लागवळ करून उत्पादन घेण्याची तयारी दर्शविली आहे. विशेष बाब म्हणजे फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंब्याची सर्वात म्हागाडी जात म्हणजे मियाझाकी आंबा त्याचे उत्पादन आपल्या देशात देखील होऊ शकते हे प्रगतशील शेतकरी भालचंद्र ठाकूर यांनी सिद्ध करून दाखविले आहे.