ललित कुमार बाळबुद्धे यांच्या मार्गदर्शनात शेतकऱ्यांची सभा संपन्न.

अर्जुनी मोर, दि. 17 मे : बाराभाटी येथील धान उत्पादक शेतकरी यांनी 13 मे रोजी सभेचे आयोजन केले होते. प्रोत्साहन राशी वंचित शेतकऱ्यांना कधी मिळणार या विषयावर ललित कुमार बाळबुद्धे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था चे तालुका अध्यक्ष, यांनी मार्गदर्शन केले यावेळी तुलाराम मारगाये अध्यक्ष, आदिवासी सेवा सहकारी संस्था बारावाटी, तसेच अँड. पोमेश रामटेके कायदे विषयक सल्लागार हे उपस्थित होते.

यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या बाजू मांडल्या तसेच सर्व संस्थांतर्फे पुढील वाटचाली करीता प्रोत्साहन राशी कशा पद्धतीने मिळणार याबाबत माहिती देण्यात आली, तसेच पोमेश रामटेके यांनी शेतकऱ्यांना उत्तमरीत्या मार्गदर्शन केले, अनेक विषयावर साधक बाधक यांनी चर्चा केली. त्यामधून सर्वानुमते पुढील वाटचालीवर निर्णय झाला. त्या निर्णयाला अनुसरून धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन राशी कशी मिळणार यावर रूपरेषा ठरली.

Leave a Comment

और पढ़ें