खासदार सांस्कृतिक महोत्सव; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज साकोलीत.


गोंदिया, दि. 07 ऑक्टोंबर : केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या माध्यमातून साकारलेल्या वैनगंगा पांगोली खासदार सांस्कृतिक महोत्सवाच सांगता समारंभासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज 07 ऑक्टोंबर रोजी साकोली येथे येत आहेत.

खासदार सुनील मेंढे यांच्या संकल्पनेतून वैनगंगा पांगोली खासदार सांस्कृतिक महोत्सव भंडारा व गोंदिया या दोन जिल्ह्यात घेण्यात आला होता. त्याअंतर्गत नागरिकांसाठी तसेच युवकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन तालुका व जिल्हास्तरावर करण्यात आले होते. या महोत्सवाची सांगता समारोह ७ व ८ ऑक्टोबर रोजी साकोली येथील परेड ग्राउंड येथे आयोजित करण्यात आले आहे.

स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक असे रोख बक्षीस दिले जाणार आहे. समारोपीय कार्यक्रमाचे उद्घाटन दुपारी २ वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अन्य मान्यवर उपस्थित राहतील. समारोपाला भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाचे प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ उपस्थित राहणार आहेत. महिला, युवक आणि युवती अशा तिन्हीही गटात तालुकास्तरावर विजेत्या समुहांना आकर्षक बक्षीस देण्यात आले होते.

जवळपास ५ हजार ७०० स्पर्धकांनी या महोत्सावात आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले होते. सोबतच २५ हजाराहून अधिक प्रेक्षकांनी या स्पर्धेचे आनंद लुटला. दोन्ही दिवस लोकसभा मतदारसंघातील विविध तालुक्यातून विजयी होत लोकसभा स्तरावर दाखल झालेल्या १०८ समूहांचे आकर्षक नृत्याविष्काराचा आस्वादही घेता येणार आहे. नागरिकांनी आणि नृत्यप्रेमींनी दोन्ही दिवसांच्या कार्यक्रमाला हजेरी लावावी, असे आवाहन खासदार सुनील मेंढे यांनी केले आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें