गोंदिया, दी. 27 सप्टेंबर : उपविभागीय अधिकारी, अर्जुनी/ मोर. यांना अर्जुनी/मोर. उपविभागातील पोलीस पाटील भरती चे अर्ज प्रक्रिया पुन्हा दहा दिवसा करीता वाढउन द्या. तसेच बिंदू नामावलीनुसार सर्व पद भरती करा, अन्यथा भरतीवर स्थगिती द्यावी, असे निवेदन ओबीसी संघर्ष कृती समिती सडक अर्जुनी च्या वतीने 26 सप्टेंबर रोजी देण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष दिनेश हुकरे, महाराष्ट्र केसरी न्यूज चे संपादक बबलू मारवाडे आणि सामाजिक कार्यकर्ते रोसन बडोले उपस्थित होते.
सविस्तर वृत्त असे की : अर्जुनी मोरगांव आणि सडक अर्जुनी, म्हणजेच अर्जुनी मोर. उप विभाग अंतर्गत पोलिस पाटील पद भरती प्रक्रियेची ( ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख ) 10 दिवस करीता मुदत वाढून देण्यात यावी. या करीता निवेदन देण्यात आले. याचे कारण की उपविभागीय अधिकारी अर्जुनी मोर. आणि जिल्हाधिकारी गोंदिया यांचे आपसात समन्वय नशल्याचे आहे. यामुळे सामान्य अर्जदरांवर अन्याय होत आहे.
दी. 18 सप्टेंबर रोजी गोंदियात झालेल्या ओबीसी आंदोलन दरम्यान उपजिल्हा अधिकारी खंडाईत साहेब यांनी ओबीसी आंदोलनाला लक्ष्यात घेऊन आश्वासन दिले त्या मुळे रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आला.
जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे हे दरम्यान काळात सुट्टीवर होते. त्या मुळे सदर चार्ज उप जिल्हाधिकारी खंडाईत यांच्याकडे होते त्यांनी स्वतः जिल्हाधिकारी साहेब यांच्याशी मी ओबीसी आंदोलन बाबद फोनवर चर्चा केली आहे असे सांगितले.
त्या मुळे त्यांच्या सागण्या नुसार संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात पोलिस पाटील भरती प्रक्रियेवर ओबीसी आरक्षण नुसार पुढील निर्णय येई पर्यंत स्थगिती राहील, आणि जिल्हा अधिकारी साहेब आल्याननंतर आम्ही माहिती तपासून यावर पुढील प्रक्रिये ची माहिती देऊ असे आस्वसण त्यांनी दिले होते.
https://fb.watch/nf_nHIQ1vf/?mibextid=2Rb1fB
या लिंकवर क्लिक करा आणि ती व्हिडिओ बातमी पाहा…
दरम्यान त्यांनी दिलेले आश्वासन हे मीडिया मार्फत लाईव्ह फेसबुक वर चालू होते. ते अनेकांनी तात्काळ पाहिले. हा ओबीसी आरक्षण बाबद मुद्दा होता, विशेष म्हणजे अर्जुनी मोर. उपविभाग अंतर्गत पोलीस पाटील भरतीचे ऑनलाइन अर्ज करण्याची सेवटची तारीख २० सप्टेंबर २०२३ होती, बातम्या पाहून अनेकांनी भरती प्रक्रियेवर स्थगिती देण्यात आली अशल्याच्या सभ्रम ठेवत अर्ज केला नाही तर ऑनलाईन केलेले अर्ज फी ची रक्कम वाया जाणार या भीतीने अर्जच केल नाही, तर अर्ज भरम्याची तारीख निघून गेली त्या मुळे अनेक अर्जदार अर्ज करण्यापासून वंचित राहिले आहे.
विशेष म्हणजे आपल्या कार्यालयाकडून अर्ज भरण्या संदर्भात पुन्हा कोणतीही माहिती मिडीयाला मिळाली नाही. त्या मुळे अर्जदर मध्ये सभ्रम निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे उप विभागीय अधिकारी वरुण कुमार शाहारे यांना आम्ही फोन वरुण विचारणा केली असता त्यांनी सांगितले की स्थगिती बाबाद आम्हाला काही माहीत नाही. आम्हाला कुठलेही पत्र जिल्हाधिकारी कार्यालया कडून आलेले नाही. त्या मुळे आमची भरती प्रक्रिया सुरू आहे. असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
अर्जुनी मोर. उप विभागातील काही अर्जदार अर्ज करण्याच्या प्रक्रिये पासून वंचित राहिले आहेत. आणि याला कारण हे ओबीसी आंदोलन आणि मिडीयाला ठरवत आहेत. ओबीसी समाजाची, मीडियाची आणि प्रशासनाची प्रतिमा बदनाम होऊ नये करीता निवेदनाला लक्ष्यात घेता मागण्या मान्य करावे अशी चर्चे दरम्यान मागणी करण्यात आली आहे.
तसेच ओबीसी संघर्ष कृती समिती चे जील्हा अध्यक्ष बबलू कटरे यांच्या मार्गदर्शनात बिंदू नामावलीनुसार सर्व पद भरती करा, अन्यथा भरतीवर स्थगिती द्यावी, असे निवेदन ओबीसी संघर्ष कृती समिती सडक अर्जुनी च्या वतीने 26 सप्टेंबर रोजी उप विभागीय अधिकारी वरून कुमार शाहारे यांना देण्यात आले.