म्हणून मी पत्रकारांना चहापानाला बोलविण्याचा पदाधिकाऱ्यांना सल्ला दिला : आ. चंद्रशेखर बावनकुळे


नाशिक, वृत्तसेवा, दि. २६ सप्टेंबर : पत्रकारांविषयी रविवारी केलेल्या वक्तव्यावरून वादंग निर्माण झाल्यानंतर बावनकुळे यांनी सोमवारी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. पत्रकार हे समाजातील सन्मानिय घटक आहेत. चुकीची बातमी छापून येऊ नये यासाठी त्यांना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाची बाजू योग्यरित्या समजावून सांगावी. त्यांच्याकडील इनपुटही महत्वाचे असतात. पत्रकार समाजाचे मतपरिवर्तन घडवू शकतात. यासाठीच मी पत्रकारांना चहापानाला बोलविण्याचा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सल्ला दिला. त्यात काहीही गैर नाही, असा खुलासा भाजप प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

लोकसभा महाविजय अभियानांतर्गत नाशिक दौऱ्यावर आलेल्या बावनकुळे यांनी सोमवारी ( दि. २५ ) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बावनकुळे म्हणाले. लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपाचा निर्णय पक्षाचा पार्लिमेंटरी बोर्ड ठरवेल. उद्या नाशिकची जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे गेली तर भाजप त्यांना मदत करेल. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे ज्या जागा जातील त्यांनाही भाजपकडून मदत केली जाईल. आमच्या वाट्याला आलेल्या जागा जिंकण्यासाठी ते आम्हाला मदत करतील, असे नमूद करत जागा वाटपाबाबत महायुतीत कोणतेही वाद नसल्याचे स्पष्टीकरण बावनकुळे यांनी दिले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपसह मित्रपक्ष ४५ प्लस जागा जिंकतील, असा दावाही त्यांनी केला.


 

Leave a Comment

और पढ़ें