सडक अर्जुनी, दि. 24 सप्टेंबर : गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. अश्यात दमदार पाऊस व वाऱ्या वावधानामुळे पोट्र्यात आलेला धान जमीन दोष झाला आहे.
काही शेतकऱ्यांचा धान नुकताच फुलावर आला आहे. तर काही शेतकऱ्याचा धान निषव्यावर आला आहे. तर काही शेतकऱ्यांचा धान पीक लोंबावर आला आहे.
अश्यातच पावसाने दमदार हजेरी वाऱ्या वावधाना सहित लावल्याने धान पीक कचाट्यात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
हा धान बांधीत असाच पडला राहिल्यास तो पाण्यात बुडून सडून जाईल अशी भीती शेतकरी उपस्थित करीत आहे.
एकीकडे नुकताच निशव्यावर अशलेला धानपिकाला विविध रोगाने घेरले आहे. शेतकरी फवारणी करू करू थकला आहे. शेतकऱ्याला आलेला खर्च सुधा निघणार नाही अश्या चिंतेने शेतकरी संकटात सापडला आहे. त्या मुळे चिंता ग्रस्त शेतकऱ्याची शासनाने मदत करावी अशी मागणी होत आहे.