भंडारा, दी. 13 सप्टेंबर 2023 : ग्रामीण भागातील मुलभूत सुविधांची विकास कामे खा.प्रफुल पटेल यांच्या माध्यमातून प्रस्तावित करण्यात आले होते. या कामांना ग्रामविकास व पंचायत विभागाने मंजूरी प्रदान करीत ०५ कोटीचा निधी दिला आहे. या निधीतून जिल्ह्यातील ६८ कामे होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या माध्यमातून मुलभूत सुविधांच्या कामांकडे खा. प्रफुल पटेल यांचे लक्ष वेधण्यात आले होते.
जिल्ह्याचा सर्वांगिण विकासासाठी कटिबध्द असलेले खा.प्रफुल पटेल सतत शासनस्तरावर पाठपुरावा करून जास्तीत जास्त निधी खेचून आणत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांशी संवाद साधून गावस्तरावरील समस्याही जाणून घेतात. त्यातून प्राप्त झालेल्या समस्या मार्गी लावण्याचे काम अगत्याने करतात. राज्याच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाकडे खा. प्रफुल पटेल यांच्या माध्यमातून २५/१५ व १२/३८ या लेखाशिर्षक अंतर्गत जिल्ह्यातील अनेक कामे प्रस्तावित करण्यात आली होती. दरम्यान राज्य शासनाने खा.प्रफुल पटेल यांनी सुचविलेल्या कामांना सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील तरतुदीतून ०५ कोटीचा निधी मंजूर केला आहे. त्याचप्रमाणे ६८ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
०५ कोटीच्या निधीतून प्रस्तावित कामे त्वरित सुरू करण्यात यावे, अशा सुचनाही शासन निर्णयातून संबधित यंत्रणेला निर्गमित केल्या आहेत. यामध्ये रस्ता सिमेंटीकरण, आवारभिंत, सभामंडप व सौंदर्यीकरण, प्रवासी निवारा, ऊर्जा सोलर लाईट बसविणे, रस्ता खडीकरण, नाली बांधकाम, अशा आदि कामांचा समावेश आहे. जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी ०५ कोटीचा निधी खेचून आणल्याबद्दल नागरिकांकडून खा. प्रफुल पटेल व माजी आमदार राजेंद्र जैन यांचे आभार मानले जात आहेत.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मुलभूत सुविधांच्या विकास कामांमध्ये मोहाडी तालुका – मौजा निलज बु. येथे श्री कोठीराम डोळस यांचे प्लॉट पासून होगाराम ईश्वरकर यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम १०.०० लक्ष, मौजा नेरी येथे मुकराम मेश्राम ते भोसा रोड नेरी कडे जाणारा रस्ता सिमेंटीकरण करणे 10.00 लक्ष, मौजा कांद्री येथे मेहर आटा चक्की ते नवप्रभात शाळा पर्यंत सिमेंट रस्ता १०.०० लक्ष, मौजा रोहा डाबर रोड पासून ते नदीघाट पर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे. १०.०० लक्ष, राज्यमार्ग ३५६ ते पांजरा सा.क्र.६/००० ते ६/५०० सिमेंट रस्ता बांधकाम करणे. १०.०० लक्ष, मौजा शिवनी येथे स्मशानभूमि कडे जाणारा रस्ता सिमेंटीकरण करणे ५.०० लक्ष, मौजा ताडगांव येथे गांव अंतर्गत सिमेंट कॉंक्रीट रस्ता बांधकाम ८.०० लक्ष, मौजा देव्हाडा खुर्द येथे शंकर कांबळे ते दयाराम कांबळे यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉक्रीट रस्ता बांधकाम करणे ५.०० लक्ष,
मौजा लेंडेझरी येथे हनुमान मंदीर ते वनिता राऊत यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रीट रस्ता बांधकाम करणे ५.00 लक्ष, मौजा खमारी बुज. येथे शंकर सोनवाने ते विठ्ठल रुखमनी मंदीर पर्यंत सिमेंट कॉंकीट नाली बांधकाम ५.०० लक्ष, भंडारा तालुका – मौजा खोकरला नरेंद्र बावणे ते चेतना भुरे यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉंकीट नाली बांधकाम करणे १०.०० लक्ष, मौजा बेला येथील यशोदा सिटीकडे जाणारा मार्ग मजबुतीकरण व सिमेंट कॉक्रीट रोड तयार करणे. १०.०० लक्ष, मौजा माडगी येथे अजय भोपे ते वसंत गोदे याच्या घरापर्यंत सिमेंट कॉक्रीट रस्ता बांधकाम करणे १०.०० लक्ष, मौजा राजेगांव येथे प्रल्हाद थोटे ते सारस्वत मेश्राम यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉंकिट रोड बांधकाम करणे. १०.०० लक्ष, मौजा खरबी येथे गोवरी रोड ते हनुमान मंदीर पर्यंत सिमेंटीकरण व मजबूतीकरण करणे. 10.00 लक्ष, मौजा खमारी बुटी येथे वाचनालय बांधकाम १५.०० लक्ष, मौजा माटोरा येथे मधुकर बोहरे ते वसंत सेलोकर यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रीट रस्ता बांधकाम ५.00 लक्ष, मौजा सर्पेवाडा येथे सयाबाई उईके सभामंडप ५.०० लक्ष,
मौजा कारधा येथे पारखेडकर ते मंगला पडोळे यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉक्रीट रस्ता बांधकाम करणे ५.०० लक्ष, मौजा पहेला ग्रामपंचायत येथील हनुमान मंदिर येथे सभा मंडप बांधकाम करणे ५.०० लक्ष, मौजा माटोरा येथे श्री संजय बागडे ते मुख्य रस्त्यापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम ५.०० लक्ष, मौजा आंबाडी येथे राघोर्ते गोडावून ते गुलाब भोदे यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉंकीट रस्ता बांधकाम करणे ५.०० लक्ष, मौजा दवडीपार बाजार येथे पवनी रोड ते कब्रस्थान कडे जाणारा रस्ता सिमेंटीकरण करणे ५.०० लक्ष, पवनी तालुका – मौजा शिवनाळा चौ. येथे नविन अंगनवाडी जवळ सभामंडप १०.०० मौजा भेंडाळा येथे स्मशानभूमि मध्ये शोक सभागृह बांधकाम १०.०० लक्ष, मौजा शेळी/मो. येथे ईश्वर नखाते ते गोडी शिवनाळा कडे जाणारा रस्त्याचे सिमेंटीकरण करणे ५.०० लक्ष, मौजा अड्याळ येथे स्मशान भूमि मध्ये सौदर्यीकरण व पेव्हींग ब्लॉक बांधकाम करणे ५.०० लक्ष,
मौजा सोमनाळा येथे उमाजी रामटेके ते हाळुजी जांभुळकर यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व नाली कव्हर सहीत बांधकाम करणे व नत्थुजी डोंगरवार ते अर्जुन जांभुळकर सिमेंट रस्ता व नाली कव्हर सहीत बांधकाम करणे १०.०० लक्ष, मौजा अड्याळ येथे मुस्लिम कब्रस्थान मध्ये सौदर्यीकरण करणे ५.०० लक्ष, मौजा गोसे (खुर्द) येथे कोतवाल चा आंबा ते श्रावणा भुते यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रीट रस्ता बांधकाम करणे ५.००लक्ष, साकोली तालुका – मौजा किन्ही/मोखे येथे परेश हायस्कूल ते शिवमंदीर रस्त्यावर सिडीवर्क व खडीकरण करणे १०.०० लक्ष, मौजा पिडकेपार येथे शिवमंदीर जवळ सभामंडप बांधकाम करण ७.०० लक्ष, मौजा सातलवाडा येथे रवि बिसेन यांच्या शेतापासुन ते शिवचरण बिसेन यांच्या शेतापर्यंत सिमेंट कॉक्रीट रस्ता बांधकाम करणे ५.०० लक्ष, मौजा गडकुंभली येथे टी. पॉईट ते स्मशाभूमिकडे जाणारा रस्ता सिमेंटीकरण करणे ५.०० लक्ष,
मौजा गिरोला येथे गोपाल सिडाम ते हरीचंद सिडाम यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रीट रस्ता बांधकाम करणे ५.०० लक्ष, मौजा एकोडी येथे स्मशानभूमि मध्ये शोक सभागृह बांधकाम करणे ५.०० मौजा कुंभली (धर्मापुरी) येथे सुनिल फुंडे यांच्या घरासमोर देवी माता मंदीर चौकात सभागृह बांधकाम १०.०० लक्ष, तुमसर तालुका – मौजा पवनारखारी गोबरवाही टोली येथे समाज मंदीर बांधकाम 10.00 लक्ष, मौजा सोनेगांव येथे हनुमान मंदीर ते लालचंद तुरकर यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रीट रस्ता बांधकाम करणे १०.०० लक्ष, मौजा बोरगाव येथे रिनायते यांचा घरापासून ते धर्मेन्द्र निमजे यांच्या शेतापर्यंत रस्ता खडीकरण करणे १०.०० लक्ष, मौजा सिहोरा येथे मंगेश साडेल ते उषाबाई लारोकर यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉक्रीट रस्ता बांधकाम ५.०० लक्ष, मौजा खरबी येथे मेन रोड ते सुभाष आगाशे यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम ६.०० लक्ष, मौजा डोगरला येथे शेतकरी भवन बांधकाम १०.०० लक्ष, मौजा कुरमुडा येथे माता मंदीर जवळ सभामंडप बांधकाम 10.00 लक्ष, मौजा नाकाडोंगरी येथे दिलीप गौपाले ते रेस्ट हाऊस पर्यंत सिमेंट कॉंक्रीट रस्ता बांधकाम ५.०० लक्ष, मौजा चिखला येथे दिलीप खोब्रागडे ते अनिल केवट याच्या घरापर्यंत सिमेंट कॉकीट नाली बाधकाम करणे ५.०० लक्ष, मौजा खापा येथे ग्राम पंचायत च्या मागच्या बाजुने मेन रोड पर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे ५.०० लक्ष, मौजा सिंदपुरी येथे गाव अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे ५.०० लक्ष,
मौजा कवलेवाडा येथे इस्माल (इस्लाईल) ते नंदराम बारागवणे यांच्या पर्यंत सिमेंट कॉंक्रीट रस्ता बांधकाम करणे ५.०० लक्ष, मौजा चिचोली येथे जि. प. पूर्व माध्यमिक शाळेच्या पटांगणावर बसण्याची व्यवस्था करणे (गॅलरी बांधकाम) ५.०० लक्ष, मौजा येरली येथे माधव पटले ते अनतराम पटले यांच्या पर्यंत सिमेंट कॉंक्रीट रस्ता बांधकाम करणे ५.०० लक्ष, मौजा देवरीदेव येथे गांव पासुन ते नदीघाट रस्ता सिमेटीकरण करणे ५.00 लक्ष, मौजा खापा येथे खापा परसवाडा जोड रस्ता ते नहरापर्यंत रस्ता मजबुतीकरण 10.00 लक्ष, लाखांदुर तालुका – मौजा बारव्हा येथे मुख्य रस्ता ते दिलीप चुन्ने यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉंकीट रस्ता बांधकाम १०.०० लक्ष, मौजा पिपळगांव कोहळी येथे पंचशील समाज मंदीर परिसर सौदर्यीकरण करणे ५.०० लक्ष, मौजा विरली बु. येथे मोरेश्वर राऊत ते आनंदराव हेमने यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे ५.०० लक्ष, मौजा ओपारा येथे प्रकाश राऊत ते एकनाथ प्रधान यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉक्रीट रस्ता बांधकाम करणे ५.०० लक्ष,
मौजा मडेघाट येथे रामकृष्ण मेश्राम ते मारोती वाघधरे यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉकीट रस्ता बांधकाम करणे ७.०० लक्ष, मौजा तावशी येथे शारदा चौक ते मुख्य रस्त्यापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम १०.०० लक्ष, मौजा मोहरणा येथे सचिन विधाते ते समाज मंदीर पर्यंत सिमेंट कॉकीट रस्ता बांधकाम करणे ५.०० लक्ष, मौजा जैतपुर येथील श्री मनोहर पडोळे यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम १०.०० लक्ष, मौजा मासळ येथे येथे गजानन महाराज मंदीराच्या आवारात व सभामंडप बांधकाम करणे १०.०० लक्ष, लाखनी तालुका – मौजा जेवनाळा येथे स्मशानभूमि कडे जाणारा रस्ता सिमेंटीकरण करणे १०.०० लक्ष, मौजा मुरमाडी/तुप येथे ग्रामपंचायत भवन ते दिनदयाल कोचे यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉक्रीट रस्ता बांधकाम करणे १०.०० लक्ष, मौजा लाखोरी येथे मेन रोड ते वरीष्ठ प्राथमिक शाळेपर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकाम करणे 5.00 लक्ष, मौजा चान्ना येथे स्मशानभूमि कडे जाणारा रस्ता सिमेटीकरण करणे ७.०० लक्ष, मौजा केसलवाडा/वाघ येथे जीईएस हायस्कलु ते प्रेमराज रामटेके यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रीट रस्ता बांधकाम करणे १०.०० लक्ष, मौजा खराशी येथे जि.प.शाळा ते देवराम फटे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम ५.00 लक्ष या विकास कामांना मंजुरी प्रदान करण्यात आलेली आहे.