सौंदड, दि. ०२ सप्टेंबर : लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित कॉन्व्हेन्ट अँड प्रायमरी इंग्लिश स्कूल, सौंदड च्या विद्यार्थांनी वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांतर्गत पोलीस स्टेशन डूग्गीपार व महामार्ग पोलिस, डोंगरगाव येथे दि. २८ अगस्त रोजी भेट दिली. यावेळी लोहिया कॉन्व्हेन्ट अँड प्रायमरी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थीनी पोलिस स्टेशन डूग्गीपार येथील पोलिस निरीक्षक आर. के. सिंगनजुडे व ईतर पोलिस कर्मचारी तसेच महामार्ग पोलिस स्टेशन चे सहा. पोलिस निरीक्षक प्रशांत भुते.
व इतर पोलीस कर्मचारी यांना लोहिया कॉन्व्हेन्टच्या हेडमिस्ट्रेस श्रीमती संयुक्ता जोशी तसेच शिक्षिका लता बंसोड, कीर्ती पांडे, पूजा कावळे, सोनाली तायडे, चांदणी शेख, पल्लवी वैश्य, प्रज्ञा वालदे, विजया हर्षे या शिक्षिकांनी राखी बांधून पोलिस विभागामार्फत कर्तव्य बजावून सर्वसामान्य जनतेच्या रक्षण करण्याच्या कर्तव्याची उतराई म्हणून हा नवोपक्रम राबविण्यात आला. यावेळी पोलिस कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्याना रायफल व इतर शस्त्रांविषयी तसेच वाहतुकीच्या नियमांविषयी थोडक्यात माहिती दिली. यामुळे विद्यार्थांच्या ज्ञानात भर पडली व नवीन अनुभव घेता आले. पोलिसांबद्दल ची भीती नष्ट झाली.