- नियमित कर्ज परतफेड करणारे शेतकरी अद्यापही प्रोत्साहन राशीच्या प्रतीक्षेत...
अर्जुना मोर., दी. 23 ऑगस्ट : नापिकी, अवकाळी पाऊस, कर्जबाजारीपणा यामुळे देशभरात शेती हा व्यवसाय बिनभरवशाचा झाला आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. अश्यातच शासनाने जाहीर केलेल्या प्रोत्साहन राशीपासून कित्येक शेतकरी वंचित आहेत. अर्जुनी मोरगाव तालुक्यात जवळपास दोन हजार पेक्षा अधिक नियमित कर्ज परतफेड करणारे शेतकरी अद्यापही प्रोत्साहन राशीच्या प्रतीक्षेत आहेत.
शासन स्तरावरून नेमकं काय तांत्रिक बाब निर्माण झाली त्याची प्रत्यक्षात शहानिशा करणार. शेतकऱ्यांकडून तृतीची पूर्तता पुन्हा करून प्रोत्साहन राशी मिळवून देण्यासाठीचे आश्वासन आमदार चंद्रिकापुरे यांनी यावेळी सेवा सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे पदाधिकारी यांनी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांची भेट घेऊन नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन राशी अद्यापही मिळाली नसल्याचे निवेदन दिले. नियमित कर्ज परत फेड करणारे दोन हजार पेक्षा जास्त शेतकरी प्रोत्साहन राशिपासून वंचित असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. या अनुषंगाने तहसीलदार अर्जुनी मोरगाव, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गोंदिया, तसेच जिल्हाधिकारी गोंदिया यांना निवेदन देऊन सुद्धा प्रोत्साहन अशी मिळाली नसल्याची सांगितले.
आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी जिल्हा उपनिबंधक गोंदिया यांच्याशी चर्चा करून तांत्रिक बाप समजून घेतली नंतर मंत्रालयातील सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक पंकज जेवले यांच्याशी चर्चा केली. असता त्यामध्ये आधार कार्ड, खाता नंबर बँकेतील दुहेरी खाते व इतर तांत्रिक बाबीमुळे या अडचणी निर्माण झाल्याची त्यांनी सांगितले.
यावर आमदार चांद्रिकापुरे यांनी सांगीतले की,वंचित शेतकरयांना त्रुटी कळली पाहिजे. त्यांचे नाव व त्रुटी संबंधित सेवा संस्थेला देण्यात यावी. त्या त्रुटींची पूर्तता करून शेतकरयांना प्रोत्साहन राशी देण्यासंबधीचे निर्देश दिले. यासंबधाने आपण प्रत्येक्षात मुंबई मंत्रालय येथे जाऊन संबंधित अधिकारी व सहकार मंत्री नामदार दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन हे प्रकरण तात्काळ निकाली काढू असे आश्वासन यावेळी आमदारांनी ललित बाळबुध्दे, लोकपाल गहाने, उद्धव मेहंदळे, योगेश नाकाडे, विनायक मस्के, रतीराम राणे, दीनदयाल डोंगरवार योगिराज हलमारे, बंडूभाऊ भेंडारकर, हिराभाऊ शेंडे, सुशांत चांदेवार सेवा सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.