सडक अर्जुनी, दि. 25 जुलै 2023 : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत योजनेस पात्र शेतकऱ्यांना प्राप्त होणारे मानधन रुपये 2 हजार, ई- केवायसि न केल्यास देय हप्ता बँक खात्यात जमा होणार नाही.
तरी आजच सर्व शेतकरी बंधू भगिनींनी आपल्या नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रात (सि एस सि) जाऊन किंवा स्वतः च्या अँड्रॉइड मोबाईल मधे पी एम किसान वर्जन 2.0 हे अँप डाउनलोड करून त्याद्वारे ई- केवायसी आणि बँकेत जाऊन आधार कार्ड बँक खात्याला लिंक करावे.
आपल्या संपर्कात येणाऱ्या इतर शेतकऱ्यांना देखील याबाबत अवगत करावे तसेच यासंदर्भात काही अडचणी असल्यास आपल्या क्षेत्रातील कृषि सहाय्यक किंवा कृषि पर्यवेक्षक यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन श्रीमती के. के. बडोले, तालुका कृषी अधिकारी, सडक अर्जुनी यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
Author: Maharashtra Kesari News
Post Views: 67