आम्हाला खासदार प्रफुल पटेल यांचेच नेतृत्व मान्य


  • तुमसर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची स्पष्टोक्ती… 

भंडारा, दि. 14 जुलै : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वरिष्ठनेते खासदार प्रफुल पटेल व अजितदादा पवार हे शिंदे फडणवीस सरकारत सहभागी झाले. दरम्यान यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये फुट पडुन दोन गट निर्माण झाले. या दरम्यान तुमसर व मोहाडी तालुक्यातील काही कार्यकर्त्यांना खा. शरदचंद्र पवार यांची भेट घेतली या दरम्यान आशिर्वाद स्वरुप काढलेले छायाचित्र माध्यमात प्रसिध्द् करुन खा. पवार यांना समर्थन जाहीर करण्यात आले. मात्र आम्ही खा. पटेल व ना. अजितदादा पवार यांच्याच नेतृत्वा खालील राष्ट्रवादी काँग्रेसशी निगडित राहु. खा. पटेल यांचेच नेतृत्व आम्हाला मान्य आहे असे स्पष्ट करीत त्यांनी त्या वृत्ताला फेटाळून लावले.

गेल्या अनेक वर्षापासुन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करीत आहोत. राजकारणातील घडामोडीत वरिष्ठ स्तरावर जे घडले ते समोर आले आहे. मात्र आम्ही खा. पटले यांच्या नेतृत्वात काम केले आहे आणि पुढे ही राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये काम करीत राहु. आगामी काळात खा. पटेल यांच्या नेतृत्वा खालील भंडारा जिल्हयात पक्षावाढी साठी आम्ही प्रयत्नरत राहु असी ग्वाही जि. प. सदस्य राजेन्द्र ढबाले, जि. प. सदस्य राजु देशभ्रतार, तालुका अध्यक्ष ठाकचंद मुंगुसमारे, वरिष्ठ पदाधिकारी छगन पारधी यांनी दिली. तसेच या सर्व पदाधिकाऱ्यांनी यांनी मुंबई येथे खा. प्रफुल पटेल यांची भेट घेवुन आपले खुले समर्थन ही जाहीर केले.


 

Leave a Comment

और पढ़ें