चप्पल जोडे शिवणाऱ्या गरीब बापाची लेक होणार पोलीस उपनिरीक्षक 


  • कोणतेही शिकवणी वर्ग न लावता खुशबूने केले यश संपादन., पोलीस स्टेशनच्या वाचनालयात तिने केला अभ्यास आणि मिळवले घवघवीत यश., परिस्थितीवर मात करून खुशबू बनणार पोलीस उपनिरीक्षक., अर्जुनी मोरगाव येथील नागरिकांनी केला आनंद व्यक्त.
  • वाचा पुढील स्टोरी… 

गोंदिया, ( बबलु मारवाडे ) दि. 08 जुलै : जीवनात कोणत्याही ध्येय प्राप्तीसाठी मनात प्रचंड आत्मविश्वास, जिद्द असणे आवश्यक आहे. दारिद्र्यात जीवन जगणाऱ्या खुशबू प्रल्हाद बरैय्या या 25 वर्षीय युवतीने स्पर्धात्मक परीक्षेचे कोणतेही वर्ग न लावता गावामध्ये राहून नियमित अवांतर अभ्यास करून महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.



तिच्या अथक परिश्रमाला यश येऊन चप्पल-जोडे शिवणाऱ्या बापाची लेक ( मुलगी ) खुशबू आता पोलिस उपनिरीक्षक होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ‘ब’ मुख्य परीक्षा 2020 अंतर्गत पोलिस उपनिरीक्षकपदाची यादी जाहीर करण्यात आली. त्यात गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील खुशबू प्रल्हाद बरैय्या या 25 वर्षीय युवतीने 364 गुण मिळवून पोलिस उपनिरीक्षक पदावर आपले स्थान निश्चित केले. खुबशूच्या या असामान्य यशाबद्दल तिचे कौतुक केले जात आहे.

खुशबू चे वडील प्रल्हाद बरैय्या हे अर्जुनी शहराच्या ठिकाणी लहानसे दुकान थाटून चप्पल, जोडे शिवण्याचे काम करतात. दोन खोल्यांच्या घरात पत्नी, एक मुलगा, दोन मुली यांच्यासह राहतात. आपल्या कुटुंबाचा गाडा चालवितात. प्रल्हाद त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतले. पत्नी आजारी असूनही मुलांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. शिक्षणापासून प्रगती नाही याची जाण त्यांना वेळोवेळी होत असल्याने त्यांनी तिन्ही मुलांच्या शिक्षणात कोणतीही उणीव भासू दिली नाही. आपले मुले शिक्षण घेऊन शासकीय पदावर कार्यरत राहावे, अशी त्यांची अपेक्षा होती.

घरामध्ये अभ्यासासाठी सोय नसताना सुद्धा ‘खुशबू’ ने स्वत: कष्ट करून, त्रास भोगून, स्पर्धात्मक परीक्षेचे कोणतेही वर्ग न लावता एमपीएससी साठी शहरात जाऊन अभ्यास वर्गाचा आग्रह केला नाही. सरकारी नोकरी करायची हा एकच ध्यास मनामध्ये अंगीकारून नियमित अभ्यास, अवांतर वाचनाने यश संपादन केले.

अर्जुनी मोरगाव पोलिस स्टेशनच्या वाचनालयात खुशबूने आपले यशस्वी भविष्य घडविले. नित्यनेम सकाळी आठ वाजता खुशबू वाचनालयात जायची. भाऊ तिला जेवणाचा डबा नेऊन द्यायचा. एकदा सकाळी वाचनालयात गेल्यावर संध्याकाळी यायची.असा संघर्ष करत तिने एमपीएससी परीक्षेमध्ये पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले.

खुशबू बरैय्या इच्या यश संपादन केल्याने परिसरातील नागरिक भारावून गेले. त्यांनी तिला पुष्प गुच्छ देऊन तिचे अभिनंदन केले तर तिला पेडे भरवून तोंड गोड केला. तिला तिच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्या देखील दिल्या. अत्यंत गरिबाच्या लेकीने यशाचे शिखर गाठल्याने अनेकांना ऊर्जा मिळाली आहे. ती आजच्या समाजासमोर एक अत्यंत सुंदर उदाहरण आहे. काबिल बानो कामयाबी अपणे आप पीचे आयेगी : टीम महाराष्ट्र केसरी न्युज गोंदिया 


 

Leave a Comment

और पढ़ें