दिल्ली, वृत्तसेवा, दिं. 08 जुलै : काँग्रेसचे नेता राहुल गांधी हे मागील काही दिवसांपासून चर्चेत राहत आहेत. त्यातच राहुल गांधी यांच्या नेर्तृत्वाने काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेने पक्षाने नवी भरारी घेतल्याचे दिसत आहे. त्यातच राहुल गांधी सर्वसामान्यांचा बॉण्ड टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत. त्याचाच दाखला देणारे काही फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे शेतातील व्हिडिओ आणि फोटो सध्या व्हायरल होत आहेत. आज सकाळी हरियाणातील सोनीपतमधील एका गावात राहुल गांधी पोहोचले. त्यावेळी त्यांनी इथल्या शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांसोबत भात लावायला सुरुवात केली.
खरे तर आज सकाळी राहुल गांधी हिमाचल प्रदेशला जात होते. मात्र वाटेत शेतकरी शेती करताना दिसले त्यानंतर ते तिथेच थांबले आणि शेतकऱ्यांसोबत भात लावले. यादरम्यान राहुल गांधी यांनी ट्रॅक्टरने शेत नांगरले.
दरम्यान, राहुल गांधी यांनी तेथे उपस्थित शेतकऱ्यांची स्थिती जाणून घेतली आणि शेतीबाबत चर्चा केली. राहुल गांधींना अचानक आपल्यामध्ये पाहून लोकही आश्चर्यचकित झाले. छायाचित्रांमध्ये राहुल गांधी शेतात पाण्यात उभे असल्याचे दिसत आहे.