सौंदड : दि. 26 जुन : गावाच्या सुरवातीला अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसले असल्याचे चित्र आहे. गावातील नाल्यांची आणि घानीची सफाई उन्हाळ्यात किंवा पावसाळा लाग्ण्यापूर्वी करणे आवश्यक आहे.
गेली 15 दिवसा पूर्वी पासून पावसाळा सुरू झाला आहे. या वर्षी पावसाळा लागल्या नंतर देखील. पाऊस मात्र 15 दिवस उशिरा आला. अश्यात ग्राम पंचायत ने गावातील नाल्यांची सफाई वेळीच करायला पाहिजे होती मात्र तसे केले नाही.
आता मात्र पावसाळा सुरू झाल्यानंतर गावातील नाल्यांची सफाई करण्याच्या कामाला सुरवात झाली आहे. नाली उपसा केल्या नंतर काढलेला गाढ हा पावसाने पुन्हा नालीत वाहून जातो. त्या मुळे नाली सफईला काही महत्व राहत नाही.
रस्त्यावर काढून ठेवलेली घान सुकण्यास वेळ मिळत नाही. त्या मुळे सदर कचरा उचलून फेकण्यास कामगार देखील तय्यार नसतात. परिणामी कचरा मुख्य मार्गावरच पडला राहतोय. या मुळे नागरिकांच्या रहदारीला अडथळा निर्माण होतो.
याला जबाबदार ग्राम पंचायत प्रशासन आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही सौंदड ग्राम पंचायत प्रशासनाने पावसाळ्यात नाली सफाईला सुरवात केली आहे. त्या मुळे गावातील नागरिकात नाराजीचा सुर पाहण्यास मिळाला आहे. लाखो रुपये नाली सफाई करण्यास खर्च केले जातात मात्र सदर घाण पुन्हा नालित जाते.
गावात अनेक ठिकाणी नाल्याच नाही. परिणामी ग्राम पंचायत ने अश्या ठिकाणी कच्ची नाली तय्यार करणे आवश्यक असते ज्या मुळे पाणी साचणार नाही. यावर्षी नागरिकांचा आक्रोश मात्र पाहण्यासारखा असेल हे मात्र खरे आहे. गावाच्या सुरवातीला अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य देखील पाहण्यासाठी मिळत आहेत. त्याची सफाई कधी होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. कचरा कुंड्या देखील तुडुंब भरलेल्या अवस्थेत असल्याचे फोटो मध्ये आपण पाहू शकतो.