तुम्ही जंगली रम्मी गेम खेळून आजपर्यंत किती पैसे कमविले युवकाचे अभिनेता अजय देवगण यांना पत्र


नांदेड, दि. 24 जुन : माहिती अधिकार कार्यकर्ते विलास शिंदे वसूरकर हे मुळचे नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील वसूर ह्या गावचे रहिवासी आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते विलास शिंदे यांच्या मोबाईलवर त्यांना बरेचदा जंगली रम्मी या ऑनलाईन गेमचे मेसेजेस येत असल्यामुळे त्यांनी महाराष्ट्रचे गृहमंत्री यांच्याकडे तक्रार केली आहे.

व जंगली रम्मी या ऑनलाईन गेमची जाहीरात करणारे अभिनेता अजय देवगण यांना खरमरीत पत्र लिहून अनेक प्रश्न विरले आहे. महाराष्ट्रातील नवतरुणांना रोजगार, शिक्षण, आरोग्य, अशा अनेक गोष्टींचा सामना करावा लागत असतानाच. नवतरुणांना चांगले विचार देण्यासाठी समाजात खुपच कमी लोक असताना. त्यातच अभिनेता अजय देवगण अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी करुन नवतरुणांना आपले केले आहे.

देवगण यांनी तरूणांना चांगले विचार देण्या एैवजी त्यांनी जंगली रम्मी या ऑनलाईन गेमची जाहीरात केली ती सोशल मिडीयावर खुप प्रदर्शित होत आहे. आणि हीच जाहीरात पाहून अनेक नवतरुण जंगली रम्मी खेळायला सुरुवात केली. बघता बघता हजारो तरूण कर्जबाजारी झाले. त्याच उद्देशाने विलास शिंदे यांनी अजय देवगण यांना लेखी स्वरुपाचे पत्र 20 जुन रोजी लिहून विचारणा केली आहे.

की तुम्ही जंगली रम्मी गेम खेळून आजपर्यंत किती पैसे कमविले हे नवतरुणांना सांगितले पाहीजे. असे अनेक प्रश्न या पत्रातून विलास शिंदे यांनी विचारले आहे. आता ह्याच विषयावर अभिनेता अजय देवगण काय प्रतिक्रिया देतात हे महत्त्वाचे ठरणार आहे. आणि विलास शिंदे यांचा केंद्र शासनाकडे पण पाठपुरावा चालू आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें