- शासकिय कामात अडथळा प्रकरणी अनेकांवर गुन्हे दाखल!
सडक अर्जुनी, दि. 23 जुन : तालुक्यातील ग्राम शेंडा येथे 21 जुन रोजी पुन्हा दोन गटात राडा झाला येथे कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिस विभागाचा फौज फाटा याठिकाणी उपस्थित होता.
सविस्तर प्रकरण पाहू : ग्राम पंचायत शेंडा च्या समोरील शासकीय जागेत सुरू असलेले, शासकिय इमारतीचे बांधकाम गेली आठ महिन्यांपासून रखडले आहे. याला गावातील 85 टक्के लोकांचा पाठिंबा आहे. तर 15 टक्के लोकांचा विरोध असल्याचे शेंडा वासियांचे सांगणे आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्ताने ग्राम. शेंडा येथील दलीत व नव बौध्द लोकांचा विकास व्हावा यासाठी जवळपास 2 कोटी 23 लाख रुपयाची निधी मंजूर करण्यात आली आहे. तर बांधकाम करण्याची जागा देखील 2019 मध्ये नीचित करून ग्राम पंचायत शेंडा यांनी नाहरकत प्रमाणपत्र देखील दिले आहे. तरी देखील गावातील 15 टक्के लोकांनी चालू बांधकाम बंद केले असल्याचा आरोप आहे.
तर सरपंच सह गावातील 85 टक्के असलेला एक गट सदर बांधकाम व्हावा अश्या आसेत आहेत. मात्र तालुका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सदर बांधकाम गेली आठ महिन्यांपासून रखडले असल्याचा आरोप काही गावकऱ्यांनी केला आहे.
ज्या 15 टक्के लोकांनी बांधकाम 2022 पासून बंद पाडले आहे. त्यांचे म्हणणे आहे की ज्या जागेवर बांधकाम होत आहे. ती जागा आमच्या आस्थेचा ठिकाण आहे. ती जागा आपल्या समाजाची आहे. या जागेवर देवी देवतांचे पूजन केले जाते. पूर्वी पासून ही जागा गावातील आकर म्हणून घोषित आहे. आम्ही याच जागेवर रोज आपली जनावरे गोळा करून रानात चरण्यासाठी नेत असतो. तर पोळा, मारबद सारखे अन्य तेव्हार याच ठिकाणी करीत असतो. असे पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. ते पुढे म्हणाले गावातील अन्य ठिकाणी सदर बांधकाम करावा त्याला आम्हाला काहीच अडचण नाही. मात्र आमच्या जागेवर बांधकाम होऊ देणार नाही. अश्या ठाम निर्णयावर 15 टक्के शेंडा वासी आहेत.
गावात दोन गटात होत असलेला राडा गेली आठ महिन्यांपासून चालू आहे. काही नागरिकांचे सांगणे आहे. ग्राम पंचायत शेंडा येथील उप सरपंचा सह अन्य पदाधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर 15 टक्के असलेला दुसर्या गटातील 13 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणी देवरी येथील उप विभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर यांच्याशी पत्रकारांनी चर्चा केली असता. त्यांनी तीन लोकांवर शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली आहे. गावातील 85 टक्के असलेला सर्व जातीय समाजातील लोक सदर बांधकाम व्हावा अश्या प्रतीक्षेत आहे. कारण ग्रामीण भागातील मुलांचा विकास व्हावा हाच उद्देश आहे. मात्र मूठभर लोकांचा विचार करून प्रशासनाची कारवाई थंड बस्त्यात असल्याचा आरोप 85 टक्के असलेल्या लोकांचा आहे.