रेतीचे ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी वन रक्षकाने मागितली 30 हजार रुपयांची लाच!


गडचिरोली, दिं. 19 जुन 2023 : अधिकारी, कर्मचारी आणि वाळू माफियात आपसी संबंध असतात यात काही शंका नाही. मात्र काहीवेळा आपसी मतभेद मधून कारवाई देखील केली जाते. त्यातील हे एक उदाहरण आपल्यासमोर आहे.

17 जुन रोजी 30 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या कथित वन रक्षकावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयातील वनरक्षकास 15 हजारांची लाच स्वीकारतांना रंगेहात अटक केली आहे, धनीराम अंताराम पोरेटी वय (33) असे लाचखोर! वनरक्षकाचे नाव आहे.

प्राप्त माहिती नुसार रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वर कोणतीही कारवाई न करता सोडून देण्यासाठी लाच मागितली. प्राप्त तक्रारीवरून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली.

नदीतील रेतीची वाहतूक करीत असलेले दोन ट्रॅक्टर एटापल्ली नाक्याजवळ पकडले. या वाहनावर कायदेशीर कारवाई न करता सोडून देण्यासाठी 30 हजार रुपये लाच रक्कमेची मागणी केली. तडजोडीअंती 15 हजार रुपये लाच रक्कन तक्रारदार यांच्या सेतू दुकानात स्वीकारताना वनरक्षक रंगेहाथ मिळून आला.

याप्रकरणी एटापल्ली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक श्रीधर भोसले, पोहवा नथ्थू धोटे, नापोशी राजेश पदमगिरवार, स्वप्नील बांबोळे, पोशि किशोर ठाकूर, संदीप घोरमोडे, संदीप उडान च चापोहवा अंगडवार यांनी केली.


 

Leave a Comment

और पढ़ें