मुंबई, दिनांक : ०२ जून : प्रसिद्ध उद्योजक गौतम अदानी यांनी मुंबईत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांची भेट घेतली आहे. सिल्व्हर ओक या निवसस्थानी ०१ मे रोजी जाऊन आदानी यांनी पवारांची भेट घेतली आहे.
या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे काही वेळापूर्वीच शरद पवार यांनी वर्षा निवसस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर काही मिनिटांतच अदानी यांनी पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीमागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
या भेटी विषयी बोलताना पवार म्हणाले, सिंगापूरचे काही लोक माझ्याकडे आले होते. काही तांत्रिक मुद्द्यावर त्यांना उद्योजक गौतम अदानी यांची भेट घ्यायची होती. म्हणून गौतम अडाणी आणि सिंगापूरचे शिष्टमंडळ यांची भेट झाली. तो तांत्रिक विषय आहे. मला काही जास्त त्यातला समजत नाही, असे पवार म्हणाले.