सरकारी यंत्रणेच्या कारभाराला बळी पडलेल्या अनेक तक्रारी या जनता दरबारात नागरिकांनी मांडल्या : खा: सुनील मेंढे


साकोली, दिनांक : ०२ जून २०२३ : साकोली तालुक्यातील नागरिकांसाठी मंगलमूर्ती सभागृहात ३० जून रोजी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. जनता दरबारात नागरिकांनी उपस्थित राहून महसूल, जिल्हा परिषद, कृषी, वीज वितरण कंपनी, घरकुल, पाणी समस्या अशा विविध विषयांवर आपल्या अडचणी मांडल्या. यातील काही तक्रारी आणि समस्या संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून खा. सुनील मेंढे यांनी निकाली काढल्या तर काहींच्या दृष्टीने ठराविक कालावधीत त्याचा निपटारा करण्यासाठी सूचना दिल्या. सहज सुटणाऱ्या मात्र सरकारी यंत्रणेच्या कारभाराला बळी पडलेल्या अनेक तक्रारी या जनता दरबारात नागरिकांनी मांडल्या होत्या.

या प्रसंगी सर्वश्री माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते , बाळाभाऊ काशिवार, जेष्ठ नेत्या सौ. रेखाताई भाजीपाले, तालुका अध्यक्ष लखन बर्वे, पं.स. सभापती गणेश आदे, जिल्हा परिषद सदस्य माहेश्वरी नेवारे, दीपलता समरीत, वनीता डोये, लायकराम भेंडारकर, माजी सभापती उषा डोंगरवार, माजी नगराध्यक्षा धनवंता राऊत, पवन शेंडे, तालुका महामंत्री प्रदीप गोमासे, उपसभापती सरिता करंजेकर, कृष्णा कोमाडवार, पंचायत समिती सदस्य सुशिल गणतीर, तसेच सर्व विभागांचे कर्मचारी तथा दिव्यांगबांधव उपस्थित होते.


 

Leave a Comment

और पढ़ें