महामार्ग पोलिसांचा अपघात डेमो उकारा फाटा येथे संपन्न.


सडक अर्जुनी, दि. २५ मे २०२३ : महामार्ग पोलीस मदत केंद्र डोंगरगाव जिल्हा गोंदिया तर्फे ( दि. २४ मे रोजी ) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक – ५३ वरील उकारा फाटा येथे अपघात डेमो घेण्यात आले.

त्यावेळी प्रभारी पोलिस अधिकारी सतीश डेहनकर पोलिस उपनिरीक्षक उपस्थित होते तर पोलिस उपनिरीक्षक प्रशांत भुते, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गेडाम, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जोकर व पोलिस अंमलदार होते.

प्रभारी पोलिस अधिकारी सतीश डेहनकर यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली की त्यांनी अपघात डेमो कसा यसस्वी केला.

प्रथम पोलीस नियंत्रण कक्ष गोंदिया येथे ०४ वाजता म. पो. केंद्राचे वायरलेस सेट वरून ट्रक आणि टू व्हीलर मध्ये अपघात झाल्याची माहिती देऊन स्टाफ सह स्ट्रेचर सह रवाना झालो. अपघाताची माहिती घेऊन लगेच अशोका टोल प्लाजा येथील मॅनेजर व ॲम्बुलन्स यांना फोन करून ॲम्बुलन्स ला कॉल करण्यात आले. पोहोचल्यानंतर स्ट्रेचर च्या साह्याने जखमीना ॲम्बुलन्स मध्ये टाकून हॉस्पिटल कडे रवाना केले.

त्या पूर्वी सडक अर्जुनी नगरपालिकेची फायर ब्रिगेड ला सुद्धा कॉल करण्यात आल होत. ब्रिगेड सुद्धा लगेच हजर झाली. संपूर्ण कारवाई २० मिनिटाच्या आत करण्यात आली.


 

Leave a Comment

और पढ़ें