बारावी परीक्षेचा निकाल आज या वेळे नंतर


गोंदिया, दि. २५ मे २०२३ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व काेकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वी) परीक्षा घेण्यात आल्या हाेत्या.



राज्यातील ३ हजार १९५ परीक्षा केंद्रांवर सुमारे १४ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली हाेती. बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी म्हणजे आज (दि.२५) दुपारी दाेन वाजल्यापासून ऑनलाइन जाहीर होईल. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येईल, अशी माहिती मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली. माध्यमांना दिली आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें