Breaking News : पुन्हा २ हजारांच्या नोटा चलनातून बाहेर!


मुंबई, वृत्तसेवा, दी. 19 मे 2023 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं शुक्रवारी मोठा निर्णय घेत २ हजारांच्या नोटा चलनातून बाहेर काढल्या आहेत. २३ मे ते ३० सप्टेंबरपर्यंत आपल्याकडच्या २ हजारांच्या नोटा बँकेत जमा करता येणार आहे. २० हजार रुपये म्हणजेच एका वेळी १० नोटा जमा करता येणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी २ हजार रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर केलाय. परंतु २ हजार रुपयांच्या बँक नोटा कायदेशीर निविदा (legal tender) म्हणून सुरू राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने “इतर मूल्यांच्या नोटा बाजारात पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत,” असे कारण देत २ हजारांच्या नोटा बाजारातून मागे घेण्याचा निर्णय जाहीर केलाय.



रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं २००० च्या नोटा चलनातून काढून घेतल्या असल्या तरी त्या नोटा सध्या अवैध ठरणार नाहीत. गेल्या काही वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बंद केल्या होत्या. त्यांच्या जागी नवीन ५०० आणि २००० च्या नव्या नोटा जारी करण्यात आल्या होत्या. नोव्हेंबर २०१६ मध्ये २ हजाराची नोट बाजारात आली होती. त्यानंतर आरबीआयने २०१९ पासून २ हजारांच्या नोटांची छपाई बंद केली आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें