गोंदिया, ( बबलू मारवाडे ) दिनांक : १७ मे २०२३ : राखीव वन विभाग म्हणजेच रिजर्व फॉरेस्ट च्या जागेत जर सामान्य माणूस शिरला तर त्याच्यावर वन विभाग तात्काळ कार्यवाई करते. असे अनेक उदाहरण आपण सर्वांनी पहिले असेल. मात्र गेली वर्ष भरा पासून वन विभागाच्या जागेत मुख्य मार्ग लगत एक कंपनीने अतिक्रमण करून आपले संसार थाटले. असे चित्र अशले तरी वन विभाग गेली वर्ष भरापासून गप्पा बसले होते. वन विभागाच्या अधिकार्यांना या बाबद कुठलीही माहिती नवती अशी देखील धक्कादायक माहिती वन परिक्षेत्र अधिकारी सुरेश जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
विशेष म्हणजे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक : ५३ कोहमारा देवरी मार्गावरील हा प्रकार आहे. दि. १६ मे २०२३ रोजी वन विभागाने गुप्त माहितीच्या आधारावर ही कार्यावाई केल्याची माहिती दिली आहे. मग तालुक्यात शेकडोच्या संखेत अश्लेले वनरक्षक, राउंड ऑफिसर आणि वन परिक्षेत्र अधिकारी कुंभकर्णी झोपेत होते की काय ? असा सवाल या नमित्ताने उपस्थित होत आहे. ज्या अर्थी खुलेआम दिवसा ढवळ्या राजरोषपने अतिक्रमण करून हा कारभार चालू होता. तर वन कर्मचारी आणि अधिकारी कुठे यात्रेवर गेले होते का अशी विचारणा होऊ लागली आहे. यावरून कुंपणाच शेत खात अश्ल्याचे समजते. वन अधिकाऱ्यांना कंपनी कडून मिळणारी चिरी मिरी बंद झाल्या मुळे ही कार्यवाई नुकतीच करण्यात आली अश्ल्याची तालुक्यातील लोकांमध्ये चर्चा रंगली आहे.
वन विभागाच्या जागेत अतिक्रमण करणारी अग्रवाल ग्लोबल इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमटेड असे या कंपनीचे नाव अश्ल्याचे वन विभागाने सांगितले आहे. ही कंपनी रायपूर येथील आहे. कंपनीचे कार्यालय देवरी येथे आहे. सडक अर्जुनी तालुक्यात उड्डाण पुल निर्मितीचे काम गेल्या वर्ष भरापासून चालू आहे. पुलाच्या कामात लागणारे सीमेंट गट्टू तयार करण्याचे काम. सडक अर्जुनी स्थित कोहमारा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या रेंगेपार सहवण क्षेत्रातील नियतक्षेत्र बाह्मणी मधील कक्ष क्रं. १६५ राखीव वन ससिकरन पहाडी परिसरात चालू होते.
आता गट्टू तयार करण्याचे काम थांबवून. अवैध रित्या वन विभागाच्या जागेत काम करणार्या कंपनी वर भारतीय वन अधिनियम १९२७ व भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ चे उल्लंघन केल्या प्रकरणी विविध कलमा अन्वये कार्यवाई करण्यात आली आहे. वाळू , गित्ती, सिमेंट बॅग, मालवाहक गाडी, जनरेटर मशीन, लोहा कापण्याची मशीन, काँक्रिट मशीन, ब्लॉक तयार करण्याची मशीन, टिन शेड, सिमेंट गट्टू 18000 नग असे अंदाजे एक कोटी रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. सदर प्रकरणाची पुढील चौकशी प्रदीप पाटील सहाय्यक वन सौरक्षक, सुरेश जाधव वनपरिक्षेत्र अधिकारी, संतोष घुगे क्षेत्र सहाय्यक, राजू उईके बीटरक्षक आदी करीत आहे. सडक अर्जुनी तालुक्यात वन विभागाच्या जागेत बऱ्याच ठिकाणी भोंगळ कारभार चालू अश्ल्याची सूत्रांची माहिती आहे.