१६ लाखाचा भूजल बंधारा तोडून शेकडो ब्रास रेतीची चोरी


सडक अर्जुनी, दिनांक : ०६ मे २०२३ : तालुक्यातील ग्राम सौन्दड येथील विधूत पंपाजवळ २०१५ – १६ मध्ये चुलबंद नदी मध्ये १५ ते १६ लाख रुपये खर्चून भूजल बंधारा बाधण्यात आला. हा बंधारा लोखंडी पत्रे व लोखंडी इंगल टाकून जमिनी खाली बाधण्यात आला होता. उन्ह्लाळ्यात जमिनी ( रेती ) खाली नदी पत्रातील पाण्याची पातळी थांबून जमिनीतील पाणी साठून राहील आणि तो पाणी विधूत पंपाजवळ अश्लेल्या विहिरीला पुरवठा होईल त्या मुळे गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होईल या हेतूने या बंधार्याची निर्मिती करण्यात आली होती.



मात्र आज घडीला या बंधार्यातून शेकडो ब्रास रेती काढून संपूर्ण बंधारा तोडून टाकला आहे. विशेष म्हणजे बंधाऱ्यातील काळी माती दिसत आहे. दरवर्षी उन्हाळा लागला की वाळूच्या चोरीला सुरवात होते. अवैध वाळू उपश्या मुळे शासनाला लाखोचा चुना लागते. असे अशले तरी महसूल विभाग कुठलीही कार्यवाई केल्याचे दिसत नाही. बंधार्याची झालेली नुकसान कोण भरून काढणार असा सवाल या निमिताने विचारला जात आहे. गावातील सरपंच यांचे जवळीक अश्लेल्या लोकांनी ही वाळू चोरी केल्याची गावात चर्चा आहे. त्या मुळे या वाळू माफियांवर कुठलीही कार्यवाई अध्याप करण्यात आली नाही. हे विशेष आहे. कुम्पंच शेत खात अश्ल्याची चर्चा आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें