धान पिकाला तुरतुडा लागल्याने दीड एकर शेतातील पिक झाले नष्ठ!


सौन्दड, दिनांक : ०६ मे २०२३ : तालुक्यातील ग्राम सौन्दड येथील शेतकरी भगवान कटकवार यांची दीड एकर शेतीत लावलेले धान पिक संपूर्ण नष्ठ झाले आहे. शेतकरी यांनी उन्हाळी शेतात आर आर ६४ जातीचा धान पिक शेतात लावला होता. शेतातील बोर बंद  अश्ल्याने दुसर्या शेतकऱ्याकडून पिकाला पाणी दिले. वेळो वेळी औषध फवारली. पेरणी पासून सर्व खर्च जवळपास ४० हजार रुपये आला. मात्र एन तोडणीला आलेला पिक तूर तुडा या रोगाने ग्रासले त्या मुळे संपूर्ण उभा पिक नष्ठ झालेला आहे.

शेतकरी स्थानिक तलाठी कडे गेला असता. तलाठी यांनी उभ्या आणि रोगीट धान पिकाला नुकसान भरपाई शासन मार्फत मिळत नश्ल्याचे सांगितले आहे. त्या मुळे शेतीला आलेला खर्च कुठून द्यायचा असे संकट शेतकऱ्यावर आले आहे. परिणामी आत्महत्या करण्याची वेळ आपल्यावर आली अश्ल्याचे शेतकरी बोलत होता. सध्या रख रखता उन्हाळा आहे. असे अशले तरी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्या मुळे कापणीला आलेला पिक देखील शेतकऱ्यांच्या हातातून जाणार अश्ल्याची भीती वेक्त केली जात आहे. अवकाळी पाऊस, वादळ, वारा, आणि बरपांच्या गारा मुळे धान पिकाला फटका बसला आहे. त्यातच तालुक्यात रानटी जनावरांचा हैदोश अश्ल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळण्याची मागणी होत आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें