मक्काटोला येथे आ. कोरोटे यांच्या स्थानिक निधि अंतर्गत वाचनालयाचे भूमिपूजन संपन्न.


गोंदिया, देवरी, दिनांक – 11 जुलै 2021 – आमगाव, देवरी विधान सभा छेत्राचे आमदार शहसराम कोरोटे यांनी आपल्या विधान सभा छेत्रातील गावांचा विकास करण्याच्या हेतूने निधी खेचून आणली व त्याचे भूमिपूजनाचे काम सतत चालू आहे. 09 जुलै रोजी सालेकसा तालुक्यातील ग्राम मक्काटोला येथे आमदार स्थानिक निधि अंतर्गत वाचनालयाचे भूमिपूजन करुन वृक्षलागड करण्यात आले.

या प्रसंगी सौ. लताताई दोनोडे माजी समाज व बाल कल्याण सभापती गोंदिया, भुवनेश्वर मेंढे वरीष्ट काग्रेस कार्यकर्ता,  संजू दोनोडे वरीष्ट काग्रेस कार्यकर्ता, रामप्रसाद दोनोडे सरपंच मक्काटोला , सौ.देशप्रेमी बडोले ग्रा.पं.सदस्य, सचिन गजभिये,  सदस्य, के.आर मेश्राम ग्रामसेवक मक्काटोला , माधोराव सहारे , देवराज खोटोले , देवराज भंडारकर , मा.संतोष बोहरे, महेंद्र सहारे, आनंद वाढई, विवेक बडोले , संदीप शेंडे व गावकरी गण उपस्थित होते.


 

Leave a Comment