तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने तब्बल 100 कोरोना यौद्धांचा सत्कार


  • तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने मे. मोदी सोनालीका सेंटर चे आभार ! 


गोंदिया, सडक/ अर्जुनी, दिनांक – 15 जून 2021 – तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने तब्बल 100 कोरोना यौद्धांचा सत्कार करण्यात आला, यात आरोग्य विभागाचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, डॉक्टर, नगरपंचायत कर्मचारी, सफाई कर्मचारी, नर्स, शिक्षक सह अन्य फ्रंट लाईन वर्कर चे प्रमाण पत्र , मास्क व श्यानिटायजर देऊन तसेच त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.





यावेळी सौन्दड येथील ग्रामीण रुग्णालय, जिल्हा परिषद नागरी शाळा, पी एस सी फुटाळा, ग्रामीण रुग्णालय खोडसीवणी, ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी, नगर पंचायत सडक अर्जुनी सह अन्य ठिकाणी जाऊन करोना यौद्धांचा सत्कार करण्यात आला, यावेळी सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी तालुका मराठी पत्रकार संघाचे आभार मानले त्यांनी सांगितले की कोरोना काळात आमच्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी खरी सेवा केली मात्र पहिल्यांदाच त्यांचा करोना यौद्धा म्हणून सत्कार करण्यात आला आहे असे यावेळी ते बोलत होते.



या यस्वी कार्यक्रमाचे संपूर्ण क्रेडिट मे. मोदी सोनालीका सेंटर साकोली व निधी मोटर्स सौन्दड यांना जाते, यांनी संपूर्ण साहित्य पुरवठा केला त्या मुळे सदर कार्यक्रम संपन्न झाले, त्या मुळे तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बबलु मारवाडे , उपाध्यक्ष असलेश माडे, सचिव सुधीर शिवणकर, मार्गदर्शक सुशील लाडे, प्रसिद्धी प्रमुख,  सदस्य आकेश बावकुळे व वेद परसोडकर यांनी मे. मोदी सोनालीका सेंटर चे संचालक श्री संदीप मोदी यांचे आभार! वेक्त केले.



 

Leave a Comment