महामानवांच्या जयंतीनिमित्त रुग्णांना फळ वाटप, महसूल प्रशासनाचा उपक्रम.


गोंदिया, अर्जुनी मोरगाव, दिनांक – 17 एप्रिल 2021 – महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती जगभरात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. अर्जुनी मोरगाव महसूल प्रशासनाच्या वतीने या जयंतीनिमित्त स्थानिक ग्रामीण रुग्णालय आणि कोविड केअर सेंटर मधील रुग्णांना उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, तहसीलदार विनोद मेश्राम यांच्या हस्ते फळे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण आणि दीपप्रज्वलनाने झाली. शिवप्रसाद सदानंद जयस्वाल येथील इंडोर स्टेडीयम मधील कोविड केअर सेंटरला उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी भेट दिली.

तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. रुग्णांना मार्गदर्शक सूचना केल्या. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर देवेंद्र घरतकर, नोडल अधिकारी सुरेंद्र कुमार खोब्रागडे, डॉक्टर भारत लाडे, बाजार समितीचे प्रशासक उद्धव मेहंदळे, डॉक्टर कविता खोब्रागडे, डॉक्टर कश्यप सूर्यवंशी, रुग्णालयातील कर्मचारी भास्कर बगमारे ,प्रियंका मडावी ,मनीषा कोटांगले, प्रियंका पंचभाई ,योगेश ब्राम्हणकर, नितेश चिंतनवार, गोपाल परिहार उपस्थित होते.


 

Leave a Comment