गोरेगाव, दि. 15 सप्टेंबर : वाघाच्या हल्ल्यात शेतकरी बसंतराव खेतराम ढोरे, वय ४४, रा. कलपाथरी ता. गोरगाव यांचे निधन झाले, प्राप्त माहिती नुसार ते दि. १३ रोजी शेतात गेले मात्र उशिरापर्यंत घरी पोहचले नसल्याने शोध मोहीम करण्यात आली, शेतकरी ढोरे त्यांचे शेत जंगला लगत असल्याने गावकऱ्यांनी जंगलामध्ये शोध घेतला असता.
सायंकाळी दि. १४ रोजी शेतकरी ढोरे यांचे मृतदेह जंगलामध्ये मिळाले, घटना स्थळावर सेवा संस्थेचे सदस्य व वन विभागाचे कर्मचारी जाऊन पाहणी केली असता सदर घटना स्थळ “एफडीसीम” यांच्या जांभळी १ वन परीक्षेत्रातील कक्ष क्र. ४२० RF असे आहे, घटना स्थळावर पोलिस विभागाचे अधिकारी यांनी भेट दिली असून मृतदेहाला शवविच्छेदन करण्यासाठी गोरेगांव येथील शासकीय रुग्णालयामध्ये पाठविण्यात आले.
Author: Maharashtra Kesari News
Post Views: 481