डांबर मार्गावर मुरूम टाकून थुकपालीस, सौंदड जिल्हा परिषद क्षेत्रातील रस्त्याची दयनीय अवस्था!

सौंदड जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य कोण ? पती की पत्नी जन माणसात सभ्रम, पतीच करतोय हुश्यारकी !! 

सडक अर्जुनी, ( बबलु मारवाडे ) दिनांक : 16 जुलै 2024 : गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्या अंतर्गत येणारे सौंदड जिल्हा परिषद क्षेत्रातील अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याचे सध्या चित्र आहे. याबद्दल अनेक वेळ आम्ही बातम्या प्रकाशित करून देखील स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. आपण फोटो आणि व्हिडिओमध्ये पाहू शकता रस्त्याने चालणाऱ्या नागरिकांना किती त्रास सहन करावा लागत आहे, चक्क रस्ता सोडून रस्त्याच्या कडेने शाळकरी विद्यार्थी चालताना आपल्याला दिसत आहेत. काही नागरिकांनी सांगितले की या मार्गाने जाणारे शाळकरी विद्यार्थी अनेक वेळ या ठिकाणी पडले आहेत.

हे दृश्य आहे सौंदड गावातील जिल्हा परिषद च्या नागरी शाळेजवळील या मार्गाने रोज शेकडो नागरिक प्रवास करतात, तर स्थानिक यांना देखील या मार्गाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे, रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाल्यांची निर्मिती करण्यात आली नसल्याने पावसाचे तसेच परिसरातील सांडपाणी हा मुख्य मार्गावर येते आणि तो पाणी ओलांडत नागरिकांना रस्ता पार करावा लागत आहे.

सौंदड जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य कोण ?

सौंदड जिल्हा परिषद क्षेत्राचे जी.प. सदस्य निशा तोडाशे या आहेत, 2023 मध्ये सौंदड रेल्वे स्थानक कडे जाणाऱ्या मार्गाची दयनीय अवस्था असल्यामुळे त्यांना आम्ही विचारणा केली असता सदर मार्गाचे काम मंजूर झाले आहेत असे त्यांनी उत्तर दिलं होत, तर गावातील अन्य मार्गाच्या दैनिय अवस्थेबाबत देखील त्यांनी सकारात्मक उत्तर दिले होते. परंतु या गोष्टीला आता तब्बल एक वर्ष लोटले आहे, मात्र या रस्त्यांची आजही दुरुस्ती वा नवनिर्माण कार्य करण्यात आले नाही.

त्यामुळे रस्त्याने चालताना नागरिकांना मार्ग शोधत चालावा लागतो, नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र केसरी न्यूज ने सौंदड येथील जिल्हा परिषद च्या मुख्य मार्गाची दयनीय अवस्था!

सौंदड जिल्हा परिषद क्षेत्रातील अनेक विकास कामे दुर्लक्षित ? या मथड्याखाली वृत्त प्रकाशित केले असता जिल्हा परिषद सदस्य निशा तोडासे यांचे पती शुभम जनबंधू हे व्हाट्सअप ग्रुप वर आक्रमक झाले असून तब्बल दोन ते तीन तास आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पत्रकारावर दबाव टाकण्याचा प्रयत्न जी.प. क्षेत्र सौंदड या व्हॉट्सॲप ग्रुप वर करीत होते, सौंदड जिल्हा परिषद क्षेत्रातील रस्त्यांची दयनीय अवस्था असलेल्या बातम्या प्रकाशित केल्यास खोट्या ॲट्रॉसिटी सारख्या गंभीर गुन्ह्यात फसवण्याचा त्यांनी जणू न बोलता इशाराच दिला आहे, व्हाट्सअप ग्रुप वर बातमीची लिंक टाकताच शुभम जनबंधू व त्यांचे कार्यकर्ते बातमीला सोडून पत्रकाराच्या वैयक्तिक जीवनावर प्रकाश टाकायला सुरुवात करतात, एकंदरीत पत्रकाराला ब्लॅकमेल करण्याचा हा प्रयत्न सौंदड जिल्हा परिषद चे सदस्य निशा तोडासे यांचे पती शुभम जनबंधू यांचे कडून केला जात आहे.

त्यामुळे सौंदड क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य पती आहेत की पत्नी असा सभ्रम जन माणसाला पडला आहे, लोक चर्चा आहे की ग्राम पंचायत सौंदड येथे सदस्य पदावर असलेले शुभम जनबंधू हे जिल्हा परिषद सौंदड क्षेत्रात ठेकेदारीचे काम करतात, मात्र या बाबद् आम्ही कुठलाही दावा करीत नाही. विशेष म्हणजे ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत. आपण अनेकवेळ पाहिला आणि ऐकले आहे की भारतीय जनता पक्षाच्या विरोधात कुणी बोलल्यास ईडी आणि सीबीआय ची कारवाई केली जाते तसाच प्रकार आता गोंदिया जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे. म्हणजे पत्रकारांनी विरोधात बातम्या लावल्या तर खबरदार असा इशारा त्यांनी दिला आहे. आणि त्यासाठी ते कुठल्याही थराला जाण्यासाठी मागे पुढे पाहणार नाही हेही तितकाच सत्य आहे. 

परंतु सौंदड जिल्हा परिषद क्षेत्रातील रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याने मार्गाने जाणाऱ्या नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. याचे निराकरण कोण करणार हा चिंतेचा विषय बनला आहे. यात सौंदड ते पळसगाव मार्ग, सौंदड ते फूटाळा मार्ग, सौंदड येथील रेल्वे स्थानकाकडे जाणारे मार्ग, सौंदड येथील हिरबाजी स्टेडियमकडे जाणारे मार्ग, सौंदड ते परसोडी गावाकडे जाणारे मार्ग, सौंदड ते पिपरी गावाकडे जाणारे मार्ग संपूर्ण फुटलेल्या अवस्थेत आहे, तर सौंदड येथील नागरी शाळे जवळील संपूर्ण मार्ग फुटलेल्या अवस्थेत आहेत वृत्त प्रकाशित झाल्या नंतर या ठिकाणी मुरूम टाकून थुक पालीस करून खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले आहे. तसेच राष्ट्रीय महामार्गावर गेली अनेक वर्षे पासून उड्डाण पुलाचे नवनिर्माण कार्य सुरू आहे. सदर मार्गाचे काम रखडले असून वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. सर्व चित्र जिल्हा परिषद सौंदड क्षेत्रातील आहेत. 

 

Leave a Comment

और पढ़ें