सौंदड येथील मालगुजारी तलावाचा कायापालट करण्यासाठी सरसावले हर्ष मोदी

सरपंच हर्ष मोदी यांनी घेतली मंत्री सुधीर मुंगंटीवार यांची भेट 

प्रतिनिधी / गोंदिया, दि. 06 जुलै : सौंदड गावाचे विकास करण्यासाठी सरपंच हर्ष मोदी यांनी पुढाकार घेतला आहे, गावातील नागरीकांना रोजगार निर्मिती व्हावी या उद्देशाने त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत, राष्ट्रीय महामार्गावर असलेले माल गुजारी तलावाचा कायाकल्प करून पर्यटन स्थळ निर्माण करण्याच्या दृष्टीने त्यांनी वरिष्ठांना निवेदन ही दिले आहे. 

सध्या मुंबई येथे पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून महाराष्ट्र शासनाच्या वतीने विविध विषयांवर, आर्थिक विषयांवर निर्णय घेण्यात येत आहे. यातच ग्राम पंचायत सौंदडचे सरपंच हर्ष विनोद कुमार मोदी यांच्या वतीने मंत्री महोदयांची भेट घेऊन सौंदड येथील तलावाला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळणे बाबत ग्राम पंचायत येथे ठराव मंजूर करून दिनांक : 23, 08, 2023 रोजी निवेदन दिले होते.

त्यावर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सकारात्मक भूमिका घेत पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांना पुढील कार्यवाहीसाठी सादर केले. गिरीश महाजन यांनी प्रस्ताव सादर करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यवाहीसाठी सादर केला आहे. यासाठी सरपंच हर्ष मोदी यांनी माजी मंत्री राजकुमार बडोले, आमदार परिनय फुके, बाळाभाऊ अंजनकर, आमदार विनोदभाऊ अग्रवाल यांनी सहकार्य केले याबाबत सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहे. 

Leave a Comment

और पढ़ें