लोहिया विद्यालयात अल्पसंख्याक अधिकार दिवस साजरा


सौंदड, दि. 19 डिसेंबर : लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ,सौंदड येथे आज दिनांक 18 डिसेंबर 2023 रोज सोमवारला विद्यालयात, संस्थापक – संस्थाध्यक्ष जगदीश लोहिया यांच्या प्रेरणेने,  मधुसूदन अग्रवाल प्राचार्य यांच्या आदेशान्वये अल्पसंख्याक अधिकार दिवस साजरा करण्यात आला.

या दिना विषयी विद्यालयातील शारीरिक शिक्षिका उमा बाच्छल यांनी अल्पसंख्याक दिनाचे विदयार्थ्यांना महत्त्व समजावून दिले. वर्ग 10 वी च्या विद्यार्थीनी वैभवी गहाणे हीने सुद्धा माहिती सांगितली तसेच शर्वरी ठाकरे हीने अल्पसंख्याक समाजावर आधारीत कविता सादर केली.

याचबरोबर विद्यालयात अल्पसंख्याक अधिकार दिवसावर आधारित विद्यार्थ्यांच्या निबंध व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाला विद्यालयातील विद्यार्थी तसेच शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.


 

Leave a Comment

और पढ़ें