सौंदड गावात अवैध रित्या दारू विक्रीचा महापूर, प्रशासन हप्ते खोरीत वेस्त ?


संग्रहित छायाचित्र


गोंदिया, ( बबलु मारवाडे ) दी. 24 नोव्हेंबर : सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम सौंदड येथे अवैध रित्या दारू विक्रीचे अनेक ठिकाणे अड्डे चालतात. यावर प्रशासन का? कारवाई करीत नाही. एकंदरीत या वेवसाईकांकडून प्रशासकिय अधिकाऱ्यांना हप्ते मिळत असतील. त्या मुळे कुठल्याही प्रकारची कारवाई सबंधित यंत्रणा करीत नसावी असा अंदाज वेक्त केला जात आहे. डूग्गीपार पोलिस स्टेशन च्या हद्दीत सौंदड हे गाव येते.

या पूर्वी महाराष्ट्र केसरी न्युज ने बातमी प्रकाशित केली असता संबंधित वीभागणे एका अवैध दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई केली होती. मात्र बाकीच्यांचे काय ? असा प्रश्न गावकऱ्यांना पडला होता. गावात एक देशी दारू दुकान आहे. तर 2 बियर बार व 1 बियर शॉप आहे. हे दुकाने उघडण्याची व बंद होण्याची नीच्छित वेळ ठरली आहे. वर्षाला शासणाकडे परवाना रीनिवर केले जाते. तर शासणाला त्यापासून उत्पन्न मिळते. मात्र गावात विना परवाना अनेक ठिकाणी दारूचे ठेके चालतात ज्यांची काही वेळ नीचीत नाही. यावर लगाम कोण घालणार ?

सौंदड गावात अवैध रित्या जवळपास 25 ठिकाणी दारूची विक्री केली जाते. काही ठिकाणी खुले आम परवाना घेतल्या सारखे विक्री केली जाते. तर काही ठिकाणी छुप्या पद्धतीने विक्री केली जाते. विशेष म्हणजे खाकी वर्दी मध्ये सुध्दा काही लोक याठिकाणी दारू प्राशन करण्यासाठी येत असल्याचे चित्र आहे. पोलिस विभाग व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याना या गावात कुठे कुठे अवैध रित्या दारूची विक्री केली जाते. त्याची माहिती आहे. असे असले तरी कारवाई मात्र शून्य आहे.

महिन्याला लाखो रुपये शासनाकडून पागर मिळत असला तरी अधिकाऱ्यांचे हप्ते घेतल्या शिवाय पोट भरत नाही का? असा सवाल जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. सौंदड गावात 24 x 7 तास अवैध रित्या दारू विक्री केली जाते. त्यामुळे गावात वेशनाधिन तरुणांची फौज निर्माण झाली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे. तेच जर आपला ईमान गहाण ठेवत असतील तर सामान्य माणसाने न्याय कुणाकडे मागावे अशा प्रश्न आज घडीला निर्माण झाला आहे.

जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक याकडे लक्ष देतील का आणि गावातील अवैध रित्या दारू विक्री करणाऱ्या माफियांना तडीपार करतील का ? असा सवाल सामान्य जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. वेशनाधीन झालेल्या तरुणानी घरा घरात कलह निर्माण केलं आहे. त्यामूळे घरातील संबंध विखुरले जात आहे. याला जबाबदार प्रशासन की दारू विक्री करणारी अवैध यंत्रणा आहे ? ते आता जनतेने ठरवायचं आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें