देवरी, दिनांक : १० मे २०२३ : साहजिकच नोव्हेंबर डिसेंबर ते मे, जून महिन्यापर्यंत संपूर्ण देशभरात जोर स्वरावर चालणे वाली महात्मा गांधी रोजगार हमी योजना आता ऑनलाईन हजेरीसाठी एन एन एम एम प्रणाली व अन्य कारणाने गोंदिया जिल्ह्यामध्ये ठप्प पडलेली आहे. अवकाळी पाऊस, ओलावृष्टी च्या पासून जिल्ह्यातील लाखो गरीब मजूर वर्ग आर्थिक संकटात सापडलेला आहे. आणि रोजगार च्या उद्देशाने कितीतरी मजूर वर्ग दुसऱ्या राज्यांमध्ये स्थलांतर होत आहे. म्हणून मंगळवार ला देवरी आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसराम भाऊ कोरडे यांनी मुंबईमध्ये राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांची भेट घेऊन देवरी, सालेकसा आणि आमगाव तालुक्यातील मनरेगा योजना अंतर्गत सार्वजनिक काम लवकरात लवकर सुरू करावे अथवा बेरोजगारी भत्ता मजूर वर्गाला देण्यात यावे अशी मागणी केली.
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरेंटी अधिनियम 2005 नुसार, या “महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरेंटी अधिनियम एक भारतीय श्रम नियम आणि सामाजिक सुरक्षा उपाय आहे “मागेल त्याला काम या नुसार मजुरवर्गाचा अधिकार आहे. यानुसार ग्रामीण क्षेत्रांमध्ये रोजगार वाढविण्यासाठी एक वित्तीय वर्षात कमीत कमी 100 दिवस मजूर वर्गांना रोजगार देण्याची हमी असते. मनरेगा अंतर्गत एक वित्तीय वर्षांमध्ये कमीत कमी 100 दिवसाची हमी देऊन बेरोजगारांना ग्रामीण क्षेत्रात रोजगार देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली.
मनरेगा अंतर्गत सडक, नहर , तलाव , विहीर, पाणंद यांच्या नवीन निर्माण करून मजूरवर्गाला त्याच्या घराच्या अंतरावरून पाच किमी अंतराच्या आत रोजगार उपलब्ध होणे त्याचप्रमाणे त्याच्या कामाला अनुसरून मजुरी मिळणे बंधनकारक आहे.
जर मजूर वर्गाने आवेदन केल्यानंतरही पंधरा दिवसाच्या आत काम मिळाला नाही तर, तो मजूरवर्ग बेरोजगारी भत्ता साठी पात्र असतो.
या करिताच आमदार सहसराम कोरोटे यांनी गोंदिया जिल्ह्यात मनरेगा अंतर्गत ठप्प पडलेल्या कामा विषयी रोजगार हमी योजना मंत्री याला निवेदन देऊन लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी केली.