केंद्र सरकारच्या विरोधात आमगाव तालुका काँग्रेस कमेटी चे आंदोलन


आमगाव, दिनांक : २६ मार्च : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्यावर सुरत ( गुजरात ) येथील न्यायलयात खोटे आरोप लावून भाजप सरकारने त्यांच्या विरोधात अनेक खटले दाखल करून त्यांना अडकवण्याचे षडयंत्र रचले आहे. त्या मुळे न्यायालयाने त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. याचा निषेध म्हणून आमगाव तालुका काँग्रेस कमेटी द्वारे केंद्रातील मोदी सरकारच्या हुकूमशाही धोरणाच्या विरोधात विविध आरोप करीत दि. २४ मार्च रोजी निषेध वेक्त करीत र्याली काढत मुख्यमंत्री शिंदे महाराष्ट्र शासन मुंबई यांना तहसीलदार आमगाव मार्फत निवेदन पाठविण्यात आले.

यावेळी संजय बहेकार अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी आमगाव, शंभूदयाल अग्रिका वरिष्ठ काँग्रेस कार्यकर्ता आमगाव, अजय खेतान शहर प्रमुख काँग्रेस कमिटी आमगाव, रामेश्वर शामकुवर अध्यक्ष अनु.जाती. तालुका काँग्रेस कमिटी आमगाव, छबुताई महेश उके जि. प. सदस्या गोंदिया, महेश उके सचिव तालुका काँग्रेस कमिटी आमगाव, राधेलाल रहांगडाले सेवा दल तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी आमगाव, अनिल शर्मा काँग्रेस कार्यकर्ता आमगाव, भैयालाल बावनकर तालुका अध्यक्ष ओबीसी विभाग, पिंकेश शेंडे उपाध्यक्ष अनु. जाती काँग्रेस कमिटी आमगाव, उज्वल ठाकूर युवक काँग्रेस जिल्हा महा सचिव, राहुल चुटे उपाध्यक्ष युवक काँग्रेस विधानसभा क्षेत्र, संतोष सती शहारे काँग्रेस उपाध्यक्ष आमगाव, येवकराम उपराळे काँग्रेस कार्यकर्ता आमगाव, सुनील मोटघरे तालुका सचिव ओबीसी विभाग आमगाव, आनंद भावे सचिव अनु.जाती काँग्रेस कमिटी आमगाव, मुकेश शिवनगर जामखारी सरपंच, पंकज पटले, अरविंद चुटे काँग्रेस कार्यकर्ता गोरठा, कुलदीप टेंभुर्णीकर तसेच अन्य काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


 

Leave a Comment

और पढ़ें